शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जात प्रमाणपत्र कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी संपावर

By admin | Updated: June 23, 2014 23:47 IST

आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर समाज कल्याण विभागामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापन करावी, या मागणीसाठी सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटना

चंद्र्रपूर : आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर समाज कल्याण विभागामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापन करावी, या मागणीसाठी सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटना तसेच कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे विद्यार्थी, पालक तसेच कर्मचाऱ्यांना मोठा संताप सहन करावा लागला.सध्या शैक्षणिक सत्र सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्राची गरज असते. अशावेळीच हा संप पुकारण्यात आल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.सोमवारी सकाळी ११ वाजता जात वैधता पळताळणी कार्यालय सुरु करण्यात आले. मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोणतेही काम सुरु केले नाही. सोमवारी सकाळी जात प्रमाणपत्र घेण्यासाठी तसेच अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने या कार्यालयात विद्यार्थी, पालक आले. मात्र त्यांचा अर्ज घेण्यासाठी येथे कुणीही तयार नसल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.समाजकल्याण विभागाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षपी शासनाच्या अध्यादेशानुसार आता अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना अध्यक्षपद देण्यात येणार आहे तर सदस्य सचिव म्हणून संशोधन अधिकारी राहणार आहे. तर सदस्य म्हणून समाजकल्याण उपआयुक्त राहतील. या समितीमध्ये अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना अध्यक्षपद न देता सहआयुक्त पदनिर्माण करून त्यांना अध्यक्षपदी नियुक्ती द्यावी, अशी संघटनेची मागणी आहे. यामुळे कामात अडथळा येणार नसून समाजकल्याणचा विभाग केवळ याच विभागाकडे असावा, अशीही मागणी आहे.सोमवार पासून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून दिवसभर कर्मचारी काळ्या फिती लावून कार्यालयात होते. शासन जोपर्यंत मागणी पूर्ण करणार नाही तोपर्यं संप सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे येत्या काही दिवसात विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रासाठी वाट बघावी लागणार आहे. (नगर प्रतिनिधी)