लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील कार्यरत सफाई कामगारांची पदोन्नती प्रकरणे निकाली काढताना कर्मचारी निवड समितीची मंजुरी घेऊन आदेश पारित करण्यात येत असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभा तारांकीत प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे. सफाई कामगारांच्या मागण्यांच्या पुर्ततेबाबत मूळ प्रश्न आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला होता.चंद्रपूर महानगरपालिकेच्या मंजूर आकृतीबंधानुसार सफाई कामगारांची ४६२ पदे मंजूर आहे.प्रत्यक्षात ४७६ कर्मचारी कार्यरत आहेत. यातील १० सफाई कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार प्रत्यक्ष पदोन्नती दिलेली असून २८ सफाई कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार टेबलवर्क व इतर कामे सोपविण्यात आली आहेत. सफाई कामगारांची २२ प्रकरणे शासन नियमाप्रमाणे अपात्र आहे. त्यांना वारसा हक्काचा लाभ अनुज्ञेय होत नाही, अशी माहितीही ना. एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या उत्तरात दिली.स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या अवलंबितांबाबतचा प्रस्ताव विचाराधीनस्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या अवलंबितांच्या मागण्यांबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तारांकीत प्रश्नाच्या उत्तरात दिली. स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या अवलंबितांच्या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत मूळ तारांकीत प्रश्न आमदार मुनगंटीवार यांनी विचारला होता. याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.
सफाई कामगारांच्या पदोन्नतीची प्रकरणे निकाली निघणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST
चंद्रपूर महानगरपालिकेच्या मंजूर आकृतीबंधानुसार सफाई कामगारांची ४६२ पदे मंजूर आहे. प्रत्यक्षात ४७६ कर्मचारी कार्यरत आहेत. यातील १० सफाई कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार प्रत्यक्ष पदोन्नती दिलेली असून २८ सफाई कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार टेबलवर्क व इतर कामे सोपविण्यात आली आहेत.
सफाई कामगारांच्या पदोन्नतीची प्रकरणे निकाली निघणार
ठळक मुद्देमुनगंटीवार यांच्या तारांकित प्रश्नाला नगरविकास मंत्र्यांचे उत्तर