शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

चिमूर तालुक्यातील खटले वरोरा तालुक्यात

By admin | Updated: August 31, 2015 00:52 IST

चिमूर तालुक्यात समावेश असलेल्या व शहरापासून १५ ते २० किमी अंतरावर असलेल्या १० ते १२ गावांचा समावेश वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्यात आहे.

खडसंगी : चिमूर तालुक्यात समावेश असलेल्या व शहरापासून १५ ते २० किमी अंतरावर असलेल्या १० ते १२ गावांचा समावेश वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्यात आहे. त्यामुळे तालुका एक आणि खटला दुसऱ्याच तालुक्यात, अशा स्थितीमुळे चिमूर तालुक्यातील गावकऱ्यांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.चिमूर तालुक्यात ९८ ग्रामपंचायती असून २३० गावांचा समावेश आहे. या गावांसाठी चिमूर व भिसी पोलीस ठाणे आहेत. चिमूर तालुक्यातील सोनेगाव (वन), आमडी, रेगांबोडी, सावरी, खातगाव, भिवकुंड, खापरी यासह १० ते १२ गावांचा समावेश वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आला आहे. या गावापासून चिमूर तालुका ठिकाण २० ते ३० किमी अंतरावर आहे. त्यामुळे चिमूर पोलीस ठाणे सोयीचे ठरते. मात्र या गावांचा समावेश ४० ते ५० किमी दूर अंतरावर असलेल्या शेगाव पोलीस ठाण्यात असल्याने गावातील नागरिकांना एखादी तक्रार दाखल करण्यासाठी शेगाव पोलीस ठाण्यात जावे लागते. यासाठी नागरिकांना आर्थिक व शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे. या गावांचा चिमूर पोलीस ठाण्यात समावेश करण्यासाठी अनेकदा गृहविभागाकडे मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)सर्वच सेवा एका ठिकाणी देण्यात याव्याचिमूर तालुक्यातील दहा ते १२ गावांचा समावेश शेगाव पोलीस ठाण्यात येत आहे. त्यामुळे गुन्हा चिमूर तालुक्यातील तर खटला वरोरा तालुक्यातील न्यायालयात चालतो. त्यामुळे सर्व सेवा एकाच तालुक्यात देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.