शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या एसटीत असतानाच वाहकाचा अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 10:30 IST

चिमूर आगारात कर्तव्यावर असलेल्या एका वाहकाने १ मार्च रोजी सरकारी दवाखाना चिमूर येथे कोरोना चाचणी केली. मात्र तरीसुद्धा त्याला कर्तव्यावर पाठविण्यात आले. २ मार्च रोजी उरकुटपार या मार्गावर मानव विकास सेवेच्या विद्यार्थ्यांच्या बसवर त्याची ड्युटी लावण्यात आली. ३ मार्च रोजी पिपर्डा येथे मानव विकास मिशनच्या बसवर कर्तव्यावर असताना सायंकाळी ५ वाजता कोरोना बाधित असल्याचा अहवाल येताच त्याला परत बोलविण्यात आले.

ठळक मुद्देसंसर्ग वाढण्याची भीती : बाधित वाहकासोबत शेकडो प्रवाशांचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल येण्यापूर्वीच वाहकांना कर्तव्यावर पाठविले. दोन दिवस प्रामाणिक कर्तव्य बजावल्यानंतर पाॅझिटिव्ह असल्याचे अधिकाऱ्यांना कळताच त्यांना अर्ध्या मार्गातून परत बोलविण्यात आले. मात्र बाधित असताना चक्क दोन दिवस कर्तव्य बजावल्याने शेकडो प्रवासी व महामंडळाचे कर्मचारी संपर्कात आले. महामंडळातील अधिकाऱ्यांच्या बेजाबदारपणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांसह, वाहक-चालकांमध्ये महामंडळाच्या अधिकाऱ्यांविषयी रोष व्यक्त करण्यात येत आहे.एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सुरु आहे. तपासणी केल्यानंतर अहवाल येईपर्यंत कर्तव्यावर पाठवू नये, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली होती. मात्र याकडे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करीत केवळ तीन तासांचा कालावधी तपासणीसाठी देवून त्यानंतर कर्तव्यावर पाठवित आहे.चिमूर आगारात कर्तव्यावर असलेल्या एका वाहकाने १ मार्च रोजी सरकारी दवाखाना चिमूर येथे कोरोना चाचणी केली. मात्र तरीसुद्धा त्याला कर्तव्यावर पाठविण्यात आले. २ मार्च रोजी उरकुटपार या मार्गावर मानव विकास सेवेच्या विद्यार्थ्यांच्या बसवर त्याची ड्युटी लावण्यात आली. ३ मार्च रोजी पिपर्डा येथे मानव विकास मिशनच्या बसवर कर्तव्यावर असताना सायंकाळी ५ वाजता कोरोना बाधित असल्याचा अहवाल येताच त्याला परत बोलविण्यात आले. असाच प्रकार चंद्रपूर येथील वाहकाबाबत घडला. त्यांनी २ मार्च रोजी तपासणी केली. दुसऱ्या दिवशी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यालासुद्धा अर्ध्या मार्गातून परत बोलविले. मात्र प्रवाशादरम्यान तो अनेकांच्या संपर्कात आल्याने एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या या प्रकारामुळे जिल्ह्यात संसर्ग वाढण्याची भीती आहे.

कर्तव्यावर न गेल्यास गैरहजरचंद्रपूर येथील एका वाहकाने चंद्रपूर-वणी बसवर कर्तव्य बजावल्यानंतर कोरोना तपासणी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची ड्युटी लावण्यात आली. मात्र आपण कोरोना चाचणी केल्यामुळे अहवाल येईपर्यंत एक दिवसाची रजा मंजूर करण्याचा विनंती अर्ज केला. मात्र अधिकाऱ्यांनी चक्क त्याची गैरहजेरी लावल्याची माहिती आहे.

एकदा एका वाहकाची रिपार्ट यायची असल्याने त्याला कामावर पाठवले. मात्र त्याचा रिर्पाट पॉझिटिव्ह आल्याने  अनेकजण संक्रमित झाले होते. असा प्रकार घडू नये म्हणून कर्मचाऱ्यांना साप्ताहिक रजेच्या एक दिवसापूर्वी कर्मचाऱ्यांना तपासणी करण्यास पाठवावे, अशी संघटनेची मागणी होती. मात्र याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.  अशा प्रकारामुळे जनतेला संक्रमित करण्याचे काम अधिकारी करीत आहेत.दत्ता बावणे,विभागीय सचिव महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना, चंद्रपूर

याबाबत माहिती मिळाली आहे. दहा-दहा जणांना तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. जोपर्यंत कोरोनाचा अहवाल येत नाही, तोपर्यंत त्यांना रजा देण्याच्या निर्णयावर विचार करण्यात येईल.-सेवकराम हेडाऊ,प्रभारी वाहतूक निरीक्षक 

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याstate transportएसटी