शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

खासगी डॉक्टरांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा पांगळी

By admin | Updated: January 18, 2015 23:18 IST

शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालय आहे. यातील बोटावर मोजण्याइतक्या रुग्णालयात सोयी सुविधा उपलब्ध आहे. रुग्णालयात बॉम्बे नर्सिंगहोम अ‍ॅक्टनुसार सुविधा असणे गरजेचे

चंद्रपूर : शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालय आहे. यातील बोटावर मोजण्याइतक्या रुग्णालयात सोयी सुविधा उपलब्ध आहे. रुग्णालयात बॉम्बे नर्सिंगहोम अ‍ॅक्टनुसार सुविधा असणे गरजेचे असतानाही याकडे पद्तशीरपणे दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे, या रुग्णालयावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेकडे संबंधित अधिकारीच उपलब्ध नसल्याने सध्या शहरातील खासगी रुग्णलयाचे फावत आहे.चंद्रपूर शहरामध्ये ५० च्यावर खासगी रुग्णलयांच्या टोलेजंग इमारती उभ्या आहे. या रुग्णालायापैकी काही सोडल्या तर बऱ्याचशा रुग्णालयामध्ये अग्निशमन यंत्रणा नाही. एखाद्यावेळी आगीसारखी घटना घडल्यास आगीवर नियंत्रण मिळणार तरी कसे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. काही डॉक्टरांनी मात्र ही यंत्रणा बसवून आपली सुरक्षा केली आहे. या डॉक्टरांचे तरी किमान अनुकरण करणे अपेक्षित आहे. मात्र असे होताना दिसत नाही. वर्षानुवर्षांपासून रुग्णालयातून रुग्णसेवेचा व्यवसाय करणाऱ्या या डॉक्टरमंडळींकडून बॉम्बे नर्सिंगहोम अ‍ॅक्टचे उल्लंघन होत आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यास कुणीच समोर येताना दिसत नाही. महानगरपालिका अस्तित्वात येण्यापूर्वी खासगी रुग्णालयावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सकांची होती. मात्र मनपा अस्तित्वात आल्यानंतर ही सर्व जबाबदारी महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या आरोग्य विभागाकडे आली आहे. या विभागाने शहरातील खासगी रुग्णालयाची तपासणी करणे, सोयीसुविधा तपासणे अपेक्षित आहे. तसा अहवालही द्यावा लागतो. मात्र संबंधित विभागातच वैद्यकीय अधिकारी वर्ग एकचे पदच अद्यापही भरले नसल्याने नियंत्रण करायचे कुणी? असा प्रश्न उपस्थीत होत आहे.शहरातील काही रुग्णालयाची स्थिती भयावह आहे. रुग्णालयापर्यंत साधी रुग्णवाहिकाहीसुद्धा पोहचू शकत नाही. असे अनेक रुग्णालय अस्तित्वात आहे. विशेष म्हणजे, ज्या रुग्णालयात रुग्णवाहिका पोहचू शकत नाही तिथे एखाद्यावेळी आग लागल्यास फायर ब्रिगेडची गाडी कशी पोहचणार हे समजण्यापलिकडे आहे. उच्चशिक्षण घेतलेल्या डॉक्टर मंडळीकडून जिल्ह्यातील नागरिकांना सेवा मिळत आहे. ही आनंदाची बाब असली तरी डॉक्टरांकडून नियमांचे उल्लंघन होणे त्यांच्या प्रतिष्ठेसाठी शोभणारी बाब नक्कीच नाही. (लोकमत चमू)