शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘पोलीस सारथी’ घेणार महिला व मुलींची काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 22:48 IST

काही कारणास्तव एखाद्यावेळेस महिला व मुलींना रात्री, मध्यरात्री बाहेर पडावे लागते. अशावेळेस अनेक महिला व मुलींना छेडखाणीच्या प्रकाराला सामोर जावे लागत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र आता चंद्रपूर पोलिसांनी ‘पोलीस सारथी’ हा उपक्रम सुरु केला असून या उपक्रमाद्धारे रात्री १० ते पहाटे ५ वाजताच्या दरम्यान संकट ओढावलेल्या स्त्रियांनी पोलिसांना फोन व मॅसेजद्वारे माहिती दिल्यास पोलीस आपल्या वाहनात बसवून त्यांना घरी सोडणार आहेत. या उपक्रमाचे शनिवारी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ : चंद्रपूर पोलिसांचे विशेष पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काही कारणास्तव एखाद्यावेळेस महिला व मुलींना रात्री, मध्यरात्री बाहेर पडावे लागते. अशावेळेस अनेक महिला व मुलींना छेडखाणीच्या प्रकाराला सामोर जावे लागत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र आता चंद्रपूर पोलिसांनी ‘पोलीस सारथी’ हा उपक्रम सुरु केला असून या उपक्रमाद्धारे रात्री १० ते पहाटे ५ वाजताच्या दरम्यान संकट ओढावलेल्या स्त्रियांनी पोलिसांना फोन व मॅसेजद्वारे माहिती दिल्यास पोलीस आपल्या वाहनात बसवून त्यांना घरी सोडणार आहेत. या उपक्रमाचे शनिवारी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.रात्री बसस्थानक, रुग्णालयात किंवा इतर ठिकाणी महिला आणि मुली अनेकदा अडकतात. अशा वेळेस त्यांना मदत मिळत नाही. विशेषत: त्यांच्याकडे घरापर्यंत पोहोचण्यासाठी साधन उपलब्ध नसते. अशा परिस्थिती एखादा अनोळखी व्यक्तीकडून मदत मागणे धोकादायक ठरु शकते. मदतीच्या बाहाण्याने महिलांवर अत्याचार केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा परिस्थिती रात्रीच्या सुमाराला संकटात अडकणाऱ्या महिलांना सुरक्षेचा विश्वास आणि संरक्षणाची हमीसाठी चंद्रपूर पोलिसांनी पोलीस सारथी उपक्रमाचा शुभारंभ केला.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने महिला अािण मुली उपस्थित होत्या. ही योजना जिल्हाभरात राबविली जाणार आहे. यासाठी पोलीस दलास सहा अतिरिक्त वाहन दिले जाईल, असे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. सध्या उपलब्ध वाहन आणि संसाधनातच ही योजना राबविली जाणार आहे.मदतीसाठी क्रमांकरात्री १० ते सकाळी ५ या दरम्यान संकटात सापडलेल्या महिला आणि मुलींना मदत हवी असल्यास पोलीस नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक (०७१७२-२५१२००, २६३१००, २७३२५८), महिला हेल्पलाईन (१०१९) आणि व्हॉट्सअ‍ॅप (९४०४८७२१००) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संकटातील महिलांना पोलीस घरापर्यंत सोडून देईल. हा याच योजनेचा हेतू आहे.