शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात बनावट नंबरची कार जप्त

By admin | Updated: January 11, 2017 00:36 IST

परिवहन विभागाकडे नोंदणी न करताच गेल्या सात वर्षांपासून रस्त्यावर धावणारी कार चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या चमूने मंगळवारी जप्त केली.

चंद्रपूर : परिवहन विभागाकडे नोंदणी न करताच गेल्या सात वर्षांपासून रस्त्यावर धावणारी कार चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या चमूने मंगळवारी जप्त केली. एम.एच. ३४ एए ४०९६ असे बनावट नंबर लिहून गेल्या सात वर्षापासून इंडीगो कार रस्त्यावर धावत होती. गेल्या सात वर्षांपासून नोंदणी न करताच कार रस्त्यावर धावत असल्याची गोपनिय माहिती चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या चमूला मिळाली. या माहितीच्या आधारे चंद्रपूरचे मोटार वाहन निरीक्षक परिक्षीत पाटील, सहायक मोटार वाहन निरीक्षक लेदाळे, चौधरी व वाहनचालक चौधरी या चौघांच्या चमूने वरोरा नाक्यावरील नवीन उड्डाणपुलाजवळ शेमदेव बालाजी दोडके रा. चंद्रपूर या कार चालकाला थांबवून कारची चौकशी केली. तेव्हा त्याच्याकडे कागदपत्र आढळून आली नाही. त्यामुळे कार पोलीस वाहतूक शाखेत जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कारवर असलेला एम.एच. ३४ एए ४०९६ हा क्रमांक चंद्रपूर जिल्ह्यातीलच असला तरी या क्रमांकाची स्वीफ्ट डिझायर ही कार सर्व कार्यवाही करून औरंगाबाद जिल्ह्यात वळती करण्यात आली आहे. मात्र याच नंबरवर इंडीगो कंपनीची कार चंद्रपुरात धावत होती. ही कार जेव्हा खरेदी करण्यात आली, तेव्हा परिवहन विभागाकडे कोणतीही नोंदणी किंवा टॅक्स भरण्यात आलेले नाही. गोपनिय माहितीवरून शेमदेव दोडके यांच्याकडून ही कार जप्त करण्यात आली असून कारचे कागदपत्र सादर करण्यासाठी त्यांना सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)व्याजासह भरावे लागणार टॅक्सजप्त करण्यात आलेली कार सोडविण्यासाठी कार मालकाला सात वर्षाचा कर व्याजासह भरावे लागणार आहे. तसेच नोंदणी व इतर कार्यवाही पूर्ण केल्यानंतरच कार सोडली जाणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.