शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मनपातील अर्हताधारक सफाई कामगारांना पदोन्नतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:37 IST

शहर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या अनेक सफाई कामगारांची शैक्षणिक पात्रता असूनही त्यांची अद्याप पदोन्नती झाली नाही. त्यामुळे अहर्ताधारक सफाई कामगारांची पदोन्नती करावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य सफाई कामगार संघटना शाखा चंद्रपूरची सोमवारी मनपा आयुक्तांसोबत बैठक पार पडली.

ठळक मुद्देसफाई कामगारांची बैठक : उपायुक्तांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या अनेक सफाई कामगारांची शैक्षणिक पात्रता असूनही त्यांची अद्याप पदोन्नती झाली नाही. त्यामुळे अहर्ताधारक सफाई कामगारांची पदोन्नती करावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य सफाई कामगार संघटना शाखा चंद्रपूरची सोमवारी मनपा आयुक्तांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी उपायुक्तांनी काही मागण्यांना मंजूरी दिली. तर काही मागण्यांवर विचार करुन निकाली काढण्याचे आश्वासन दिले.सफाई कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्टीचा लाभ देण्यात यावा, किंवा शासकीय सुट्टीच्या दिवशी काम केल्यास त्यांचा आर्थिक मोबदला देण्यात यावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेतंर्गत कर्मचाºयांना मोफत घरकुल देण्यात यावे, कालबद्ध आश्वासीत प्रगती योजनेचे लाभ १२ ते २४ वर्ष सेवा पूर्ण केलेल्या पात्र कर्मचाºयांना देण्यात यावा, सफाई कर्मचारी मोठ्या प्रमाणात घाण साफ करीत असतात. त्यामुळे त्यांना अस्वच्छ भत्ता लागू करण्यात यावा, स्वच्छता कर्मचारी उन्हात काम करीत असतात. परिणामी त्यांना उष्माघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे सफाई कर्मचाºयांच्या कामाच्या वेळेत बदल करण्यात यावा, बायोमॅट्रीक्स थम मशीनवर थम मारण्याची योग्य वेळ ठरवून देण्यात यावी, कर्मचाºयांचा वेळ ठरवलेला असेल तर ते योग्य वेळेवर आपले काम करु शकतील, त्यामुळे या कर्मचाºयांवर आर्थिक बोझा वाढणार नाही, तसेच अर्हताधारकांना पदोन्नती देण्यात यावी, अशा विविध मागण्या प्रलंबित आहे.या सर्व प्रलंबित मागण्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान उपायुक्तांनी कामगार संघटनेच्या काही मागण्यांना मंजुरी दिली. तर उर्वरीत मागण्यांवर विचार करून लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले.या बैठकीत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटना चंद्रपूर शाखाचे जिल्हाध्यक्ष सतीश असरेट, जिल्हा संघटक युवराव बिरीया, कोषाध्यक्ष निलेश नन्हेट, जिल्हा सदस्य विश्वनाथ महातव, सचिन नन्हेट, अरविंद बक्सरीया, सुनील महातव, सुनील राठोड, राजा खोडे, अमर दुलगज संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.