शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

टाटा ट्रस्टच्या सहकार्याने चंद्रपुरात उभारणार कॅन्सर हॉस्पिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 00:42 IST

चंद्रपूर-गडचिरोली या जिल्ह्यांसाठी १०० खाटांचे कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपुरात उभारण्यात येणार असून वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने......

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : सहा तालुक्यांमध्ये राबविणार सधन शेतकरी प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर-गडचिरोली या जिल्ह्यांसाठी १०० खाटांचे कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपुरात उभारण्यात येणार असून वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने हे कॅन्सर हॉस्पीटल पुढील वर्षी जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे.मंगळवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.हसनाबादे, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. गजानन कांबळे, टाटा ट्रस्टच्या कॅन्सर विभागाचे ऋषभ कनोडीया, लक्ष्मण सेतुरामन, गणेश निलम, अनमोल रेले आदींची उपस्थिती होती.या बैठकीत चंद्रपूर येथे कॅन्सर हॉस्पीटल उभारण्याबाबत विस्तृत चर्चा झाली. चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्हयात कॅन्सर रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता चंद्रपूर येथे कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याची आवश्यकता ना. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिपादित केली. टाटा ट्रस्ट, चंद्रपूर जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णालय उभारण्यात येणार आहे. रुग्णालयाची इमारत जिल्हा प्रशासनातर्फे तर यंत्र सामुग्री, मार्गदर्शन आणि तज्ज्ञ याबाबतची जवाबदारी टाटा ट्रस्टतर्फे घेतली जात आहे. अशा पध्दतीचे कॅन्सर हॉस्पीटल आसाम राज्यात टाटा ट्रस्टतर्फे उभारण्यात आले आहे.या कॅन्सर हॉस्पिटलसाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन, टाटा ट्रस्ट व संचालक वैद्यकीय शिक्षण यांच्यात सामंज्यस कराराचा नमुना तयार करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. इमारत बांधकाम आणि पायाभुत सुविधा राज्य सरकारतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक वर्षीय पदविका अभ्यासक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर्सना कॅन्सर उपचारा संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. टाटा मेमोरियल हॉस्पीटल मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपुरात येत्या वर्षभरात हे कॅन्सर हॉस्पीटल उभे राहणार असून त्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांना उपचाराची मोठी सोय उपलब्ध होणार आहे.सधन शेतकरी प्रकल्पचंद्रपूर जिल्हयातील मूल, पोंभुर्णा, बल्लारपूर, जिवती, गोंडपिपरी आणि नागभीड या तालुक्यांमध्ये टाटा ट्रस्टच्या सहकार्याने सधन शेतकरी प्रकल्प राबविण्यात येणार असून टाटा ट्रस्टची चमू या तालुक्यांमध्ये सुक्ष्म नियोजनाचे तसेच माहिती संकलनाचे काम करणार आहे. शेतकºयांचे पीक उत्पन्न वाढावे, कुकूट पालन, शेळी पालन, डेअरी क्लस्टर, फलोत्पादन, सुक्ष्म सिंचन या सुविधा उपलब्ध करुन देत शेतकºयांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न या सधन शेतकरी प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.