शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांक शुल्क वाढ रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:08 IST

राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात दरवाढ करुन समाजातील सर्वसामान्य माणसाला न्यायालयापासून दूर ठेवण्याचा प्रकार चालविला आहे.

आॅनलाईन लोकमतभद्रावती: राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात दरवाढ करुन समाजातील सर्वसामान्य माणसाला न्यायालयापासून दूर ठेवण्याचा प्रकार चालविला आहे. हा प्रकार बंद करून मुद्रांक शुल्कवाढ रद्द करावी, अशी मागणी तालुका अधिवक्ता संघाने केली. तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.१६ जानेवारी २०१७ ला महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढून कोर्ट फी कायद्यात अवाढव्य वाढ केली. या वाढीमुळे गरीब जनतेला कोर्टातून न्याय मागणे कठीण होणार आहे. पूर्वी साध्या अर्जाकरीता १० रुपये कोर्ट स्टॅम्प लागत होता. आता त्याकरिता २५ ते ५० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली. विविध प्रकरणांत दावा दाखल करणे तसेच किरकोळ कामासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात मुद्रांक शुल्क लावण्यात आला आहे. ही वाढ चार पट केल्याने गरीबांना संकटांचा सामना करावा लागत आहे. शुल्क वाढीने यापुढे सामान्य नागरिकांना न्यायालयात जाणे कठीण होणार आहे. संविधानाशी प्रामाणिक राहून सरकारने गरीबांच्या हिताचा विचार करणे गरजेचे आहे. न्याय मिळविण्याच्या मार्गात अडचणी वाढविण्याचे धोरण राबविणे चुकीचे आहे. मात्र, शुल्क वाढीने मोठा अन्याय झाला. राज्य सरकारने ही शुल्क वाढ तातडीने रद्द करावी, अशी मागणी तालुका अधिवक्ता संघाने तहसीलदार महेश शितोळे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. अध्यक्ष अ‍ॅड. उद्धव पलिकुंडावार यांच्या नेतृत्वात अ‍ॅड.शेख, अ‍ॅड. अरुण तामगडे, अ‍ॅड. मिलिंद रायपूरे, अ‍ॅड. भालेराव अ‍ॅड. पथाडे, अ‍ॅड. पाटील. अ‍ॅड. मून, अ‍ॅड. भागवत आदी उपस्थित होते.