शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांना आॅनलाईन अर्जाची अट रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:02 IST

शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने संजय गांधी निराधार, श्रावणबाळ निवृत्ती वेतन व इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना सुरु आहे.

आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने संजय गांधी निराधार, श्रावणबाळ निवृत्ती वेतन व इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना सुरु आहे. या योजनांची अंमलबजावणी तहसील कार्यालयामार्फतीने केली जाते. या योजनेच्या लाभार्थ्यांना आॅनलाईन अर्जाची अट घालण्यात आली. यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने निराधारांना आॅनलाईन अर्जाची अट वगळण्याची मागणी बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे व लाभार्थ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या एका निवेदनातून केली आहे.राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाने येथील नायब तहसीलदार रमेश कुळसंगे यांच्यामार्फत मंगळवारी निवेदन देण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधार योजना निवड समितीचे सदस्य रमेश पिपरे, राजमल्ला सुंदरगिरी, लाभार्थी लटारी गौरकार, रामचंद्र पिंपळशेंडे, आबाजी गौरकार, मनोहर झुंगरे, संभा पारखी, अनुसया पिंपळशेंडे, राधाबाई पारखी, कुसूमबाई मोरे, त्रिवेणाबाई गौरकार आदींचा समावेश होता.राज्य शासन व केंद्र सरकारच्या माध्यमातून गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी व अपंग, विधवा, दुर्धर आजारग्रस्त महिलांना दिलासा मिळावा म्हणून संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून आर्थिक अनुदान दिले जाते. त्यात ६५ वर्षांवरील वृद्धांना त्रास होवू नये व सन्मानाने जीवन जगता यावे म्हणून श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनाच्या माध्यमातून मंजूर लाभार्थ्यांना दरमहा ६०० रुपये अनुदान मिळते. शेतकरी, शेतमजूर आर्थिक दुर्बल घटकांसाठी सदर योजना दिलासा देणारी आहे. मात्र निराधार महिला व वृद्धांना आॅनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून अर्ज करावे लागत आहे.आॅनलाईन अर्ज प्रक्रिया लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. आपले सरकार सेतू केंद्र, लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारत नाही. त्यामुळे लाभार्थी अडचणीत आले असून शासनाच्या योजनेपासून वंचित ठेवण्याचे कार्य प्रशासकीय पातळीवर केले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.