शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वादग्रस्त लेआऊट रद्द करून कारवाई करा

By admin | Updated: October 8, 2015 00:43 IST

गडचांदूर येथील वादग्रस्त सर्वे नं. ८/९ चे लेआऊट धारक गंगाराम शेरकी यांना अकृषक परवानगी दिल्यानंतर अकृषक परवानगी आदेशाचे ....

उपविभागीय अधिकाऱ्यांची शिफारस : गडचांदूर येथील भूखंड प्रकरणगडचांदूर : गडचांदूर येथील वादग्रस्त सर्वे नं. ८/९ चे लेआऊट धारक गंगाराम शेरकी यांना अकृषक परवानगी दिल्यानंतर अकृषक परवानगी आदेशाचे अटी व शर्तीचे अनुपालन न करता जमीन धारकाने अवैध लेआऊट तयार केले. त्याची प्लाट विक्री केली. तसेच सार्वजनिक प्रयोजनाकरिता खुली ठेवलेल्या जागेत सुद्धा प्लाट तयार करून विक्री केली आहे. त्यामुळे अकृषक परवानगी रद्द करून लेआऊट धारकावर कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस उपविभागीय अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.सध्याच्या मौक्यावरील परिस्थितीनुसार नव्याने सुधारीत अमिन्यास तयार करून प्रस्ताव मंजुरीकरिता सादर करण्याचे नमूद केले आहे. गडचांदूर येथील सर्वे नं. ८/९ चे लेआऊटमधील श्री गंगाराम शेरकी व इतर यांना १३ जुलै १९८२ ला अकृषक परवानगी देण्यात आली. त्यानंतर सर्वे नं. ८/९ आराजी २.८६ हे.आर. या जमिनीचा लेआऊटचा नकाशा नगर रचनाकार चंद्रपूर यांचेकडून १९८३ मध्ये मंजूर केला. परंतु लेआऊट धारकांनी लेआऊट नकाशा मंजुरीकरिता उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्याकडे सादर केला नाही.अभिन्यासातील मोकळी दर्शविण्यात आलेली जागा पूर्णपणे मोकळी ठेवणे अनिवार्य असताना शेरकी यांनी परस्पर भुखंड पाडून सक्षम अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी न घेता परस्पर भुखंड विक्री केली आहे. लेआऊटमध्ये अटी व शर्तीमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही सोई सुविधा केलेल्या नाहीत. अधिकाऱ्याचे पूर्व परवानगीशिवाय मंजूर केलेल्या भूखंडाचे विभाजन करण्यात येऊ नये, असे असताना लेआऊट धारकाने विभाजन करून प्लॉटची विक्री केलेली आहे. शासनाच्या २ आॅक्टोबर १९८० चे परिपत्रकानुसार ग्राम पंचायत गडचांदूरच्या आबादी जमिनीसाठी ०.४० हे.आर. जमिनीची मागणी केली होती. तरीसुद्धा लेआऊटधारकांनी गावठाणकरिता जागा न सोडता सदर क्षेत्र अकृषक केले. सदर लेआऊट मध्ये ओपन स्पेस तसेच रस्त्यावर लेआऊटधारकाने स्वत: अतिक्रमण करून वसतीगृहाची पक्की इमारत बांधली आहे. लेआऊटच्या नकाशाप्रमाणे पडलेले प्लाट व प्रत्यक्ष कब्जा असलेले प्लॉट यामध्ये फार मोठी तफावत असल्याने भूमी अभिलेख कार्यालय कोरपना यांनी सदर अकृषक प्रकरणात मंजूरी निवास प्रयोजनासाठी असताना बरेच भूखंडाचा वापर वाणिज्य प्रयोजनाकरिता करण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारवाईची शिफारस केली आहे. (वार्ताहर)