शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा तालुक्यातील कॅनलला अनेक ठिकाणी भगदाडे

By admin | Updated: July 16, 2016 01:18 IST

तालुक्यातील अनेक गावांच्या शेतशिवारातून लाल व पोथरा कॅनल वाहत आहे. पहिल्याच पावसात कॅनलला अनेक ठिकाणी भगदाडे पडून पाणी शेतात गेले.

मदतीची मागणी : शेतातील बियाणे वाहून गेले वरोरा : तालुक्यातील अनेक गावांच्या शेतशिवारातून लाल व पोथरा कॅनल वाहत आहे. पहिल्याच पावसात कॅनलला अनेक ठिकाणी भगदाडे पडून पाणी शेतात गेले. या पाण्याच्या प्रवाहात शेत जमीन खरडून जात बियाणेही वाहून गेल्याने कॅनल शेजारील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वरोरा तालुक्यातील २१ गावांच्या शेतशिवारातून लाल व पोथरा कॅनल वाहत असते. या कॅनलमध्ये वर्धा जिल्ह्यातील धरणामधून पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. कॅनलमधील पाणी घेऊन शेतकरी सिंचन करीत असतात. कॅनल जुने असल्याने अनेक ठिकाणी क्रॅक झाले आहे, त्याची डागडुजी योग्य प्रकारे करण्यात येत नसल्याने दरवर्षी कॅनलला भगदाडे पडून पाणी शेतात जाऊन अनेकदा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हा कॅनल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरण्याऐवजी दिवसागणिक शाप ठरत असल्यास याचे आश्चर्य वाटू नये. वरोरा, आर्वी, तुमगाव आदी गावांमधील शेतकऱ्यांचे पहिल्याच पावसात कॅनलमुळे मोठ्या प्रमाणात शेतातील नुकसान झाले आहे. तुमगाव येथील शेतकरी तारानाथ डोये यांच्या शेतानजीक कॅनलला भगदाड पडल्याने त्यांच्या शेतातील बियाणे वाहून गेले. त्यांनी कसलेली जमीनही खरडून गेल्याची तक्रार पाटबंधारे विभागाकडे नुकतीच केली आहे. पावसापूर्वी कॅनल दुरुस्ती व साफसफाईचे कामे करून हजारो रुपये खर्च केल्यानंतरही कॅनल फुटण्याची डोकेदुखी कायम राहत असल्याने केलेल्या कामाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कामाच्या चौकशीची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)