शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरगाव प्रकल्पाचे कॅनल निकृष्ट दर्जाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 00:38 IST

मागील ३० वर्षापासून डोंगरगाव प्रकल्पाच्या कॅनलचे काम सुरू करोडो रुपये खर्च होऊन सुद्धा शेतकऱ्यांना या कॅनलचे पाणी मिळू शकलेले नाही.

अंगलवार यांची तक्रार : तीन हजार शेतकरी सिंचनापासून वंचितबी.यू. बोर्डेवार राजुरामागील ३० वर्षापासून डोंगरगाव प्रकल्पाच्या कॅनलचे काम सुरू करोडो रुपये खर्च होऊन सुद्धा शेतकऱ्यांना या कॅनलचे पाणी मिळू शकलेले नाही. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाची चौकशी करून निकृष्ट काम करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी माजी पंचायत समिती सदस्य बी. एच. अंगलवार यांनी केली आहे.डोंगरगाव कॅनलची पाच किलोमीटर पायी फिरून प्रत्यक्ष पाहणी केली असता, जुन्या कॅनलची दयनिय अवस्था झाली आहे. जिथून पाणी निघते, त्या कॅनलचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे आढळले असून अनेक ठिकाणी कचरा भरलेला आहे. त्यामुळे सिमेंट काँक्रीटचे कॅनल केल्यास त्याचा वापर योग्य होऊ शकते. दहा किलोमीटरवरच पाणी बरोबर येत नाही तर लांबवर असलेल्या धानोरापर्यंत पाणी येणार कसे, असा प्रश्न त्यांनी केला आहे. सद्या धानोरा-चिचोलीच्या जंगलात करोडो रुपये खर्च करून कॅनल तयार करण्यात येत आहे. पातळी समतोल राखण्यासाठी एक मोठा पूल तयार होत असून त्यामधून पाणी शेतकऱ्यांना देण्याचा अधिकाऱ्यांचा संकल्प आहे. परंतु या ठिकाणी पाणी येणे अशक्यच दिसून येत आहे. केवळ खर्च करायचे म्हणून हा प्रचंड खर्च केला जात आहे, असे अंगलवार यांनी म्हटले आहे. डोंगरगाव प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात तीन हजार शेतकरी असून जवळपास एक हजार एकर शेतीला त्याचा फायदा मिळणार होता. १०० करोडच्यावर येथे खर्च झाले. परंतु नियोजन बरोबर नसल्यामुळे अधिकाऱ्याच्या कासवगतीच्या कार्यप्रणालीमुळे मागील ३० वर्षापासून शेतकऱ्यांना पाणी मिळू शकलेले नाही.डोंगरगाव प्रकल्पाचे पाणी मुडीगेट, सुबई, बापूनगर, चिचोली, कीवठपेठ, धानोरा या गावांना मिळाले पाहिजे. परंतु धानोरा, चिचोली पर्यंत पाणी पोहचू शकलेले नाही. पुन्हा करोडो रुपये खर्च करून कॅनलचे काम सुरू झाले. त्यामुळे खरच पाणी येणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.भेंडाळा प्रकल्पहीदयनीय अवस्थेतडोंगरगाव प्रकल्पाप्रमाणेच भेंडाळा सिंचन प्रकल्पाची स्थिती अतिशय दयनिय आहे. याठिकाणी सुद्धा करोडो रुपये खर्च झाले. मात्र हा प्रकल्प सुद्धा थंडबस्त्यात आहे. सिंचनाच्या सोयी उपलब्ध होणे आवश्यक आहेत. या सिंचन प्रकल्पावर झालेल्या खर्चाची चौकशी करून संबंधितांवर पोलिसांत गुन्हे नोंदविण्याची मागणी बी.एच. अंगलवार यांनी केली आहे.