शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत यंदा दणक्यात खरेदी; कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2022 22:53 IST

कोरोनामुळे दोन वर्षांपासून बाजारपेठांची स्थिती अतिशय वाईट होती. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मोठे, मध्यम, लघू व सूक्ष्म उद्योगांना टाळे लागले. जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या बाजारपेठांची रया गेली. कोरोना गेल्याने निर्बंधमुक्त सण उत्सवांना सुरुवात झाली. त्यामुळे यंदा व्यावसायिकांनीही जादा भांडवल गुंतवून नवीन माल भरला. खरेदीसाठी चंद्रपुरातील बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे दोन वर्षे कोंडी सहन केलेल्या नागरिकांनी यंदा दिवाळीत दणक्यात खरेदी सुरू केली. परिणामी, बाजाराने उसळी घेतली असून आठवडाभरात चंद्रपूर व जिल्ह्यात सुमारे ५०० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. पुढील आठवडाभर खरेदीचा माहोल कायम राहिल्यास ही उलाढाल दीड हजार कोटींच्या घरात जाऊ शकते, अशी माहिती चंद्रपूरच्या ठोक व्यावसायिकांनी दिली.कोरोनामुळे दोन वर्षांपासून बाजारपेठांची स्थिती अतिशय वाईट होती. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मोठे, मध्यम, लघू व सूक्ष्म उद्योगांना टाळे लागले. जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या बाजारपेठांची रया गेली. कोरोना गेल्याने निर्बंधमुक्त सण उत्सवांना सुरुवात झाली. त्यामुळे यंदा व्यावसायिकांनीही जादा भांडवल गुंतवून नवीन माल भरला. खरेदीसाठी चंद्रपुरातील बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे. लहात दुकानांतही ग्राहकांची गर्दी दिसत आहे. नोकरदारांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकही तालुका स्थळावरील बाजारात येऊन वस्तूंची खरेदी करीत आहेत. यंदा नोकरदार व कामगारांच्या हातात दिवाळीपूर्वीच बोनस पडल्याने बाजारात चैतन्य दिसून आले. यंदाच्या दिवाळीला प्रत्येकच कुटुंंब कपडे, इलेक्ट्राॅनिक्स व अन्य जीवनावश्यक वस्तू खरेदीला प्राधान्य देत आहे.

कापड बाजार सर्वाधिक तेजीत- कापड व्यावसायिकांना दोन वर्षे नुकसान झेलावे लागले. सर्वच निर्बंध हटल्याने यंदा आशा वाढविल्या. रेडिमेड कापड विक्रीतील तेजी लक्षात घेऊन ठोक व्यावसायिकांनी मोठी गुंतवणूक केली. कापड व्यवसायात सर्वात मोठी उलाढाल होत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. 

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये यंदा नावीन्य चंद्रपूर औद्योगिक वसाहतीमधील लघू व मध्यम कारखाने सुरू झाले.  बऱ्यापैकी रोजगार मिळू लागला. कोरोना काळात डबघाईस आलेली इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची बाजारपेठ यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सवापासून पूर्वपदावर आली. सजावटीसाठी नवनवीन वस्तूंची मागणी केल्याने उलाढाल वाढली. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये यंदा नावीन्य दिसून येत आहे.

ऑनलाइन शॉपिंगही वाढली  ग्राहक आता घरूनच ऑनलाइन खरेदी करीत आहेत. खरेदीसाठी वेगवेगळ्या साईट्स उपलब्ध झाल्या. त्यांच्याकडून विविध सवलती मिळत असल्याने यंदाच्या दिवाळीत ऑनलाइन खरेदीत वाढ झाली आहे.

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022