शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पडत्या दरात कापूस खरेदी

By admin | Updated: November 29, 2014 01:02 IST

यावर्षी पावसाचे दडी मारली. सिंचनाची व्यवस्था नाही अशा बिकट अवस्थेत शेतातील थोडाफार निघालेला कापूस खासगी व्यापारी ...

राजुरा : यावर्षी पावसाचे दडी मारली. सिंचनाची व्यवस्था नाही अशा बिकट अवस्थेत शेतातील थोडाफार निघालेला कापूस खासगी व्यापारी पडत्या दरात खरेदी करुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणे सुरू केले आहे. राजुरा तालुक्यात पणन महासंघाने कापूस खरेदी केंद्र सुरू न केल्यामुळे शेतकऱ्यांना आपली अडचण दूर करण्यासाठी व्यापाऱ्यांच्या घशात नेवून विकण्याची पाळी आली आहे. यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली. पावसाअभावी प्रथम पेरणी वाया गेली. उसणवारी करुन दुबारपेरणी केली. तेवढ्यात थोडाफार पाऊस पडल्याने कापसाचे झाडे चांगले डोलावयास लागले. नंतर मात्र पावसाने दडी मारली. तसेच कडक उष्णतेमुळे कापसाच्या झाडांना बोटावर मोजण्या इतके बोंड लागले. त्याची प्रथम वेचनी केली असता एकरी एक- दोन क्विंटल कापूस निघाला. वेचनी दरात मजुरांनी मोठी वाढ केली. प्रति किलो पाच रुपये वेचनी करताना रक्कम द्यावी लागत आहे. त्या रक्कमेची शेतकऱ्यांना बेभाव कापूस विकावा लागत आहे.सध्या खासगी व्यापारी प्रती क्विंटल ३ हजार ५०० ते ३ हजार ८०० दराजे कापूस खरेदी करीत आहे. देवाडा येथील व्यापारी पडत्या दरात कापूस खरेदी करुन आदिवासी व इतर शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहे. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे बेभाव खरेदी व वजनाता दांडी मारली जात आहे. असे असतानासुद्धा शेतकऱ्यांना पर्याय नसल्यामुळे नाईलाजास्तव कापूस विक्री करुन गरज भागवानी लागत आहे.शासनाकडून शेतकऱ्यांना हमी भाव वाढवून देण्याची आशा होती. शेतकऱ्यांनी महागडे बिज खरेदी करुन पेरणी केली. तसेच खत व औषधीच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी त्रस्त होता. त्यात पावसाने दडी मारल्यामुळे पिकाचे प्रमाण ५० टक्क्यावर आले आहे. जमिनीतील ओलावर नष्ट झाला. थंडी सुद्धा पडत नाही. उष्णतेमुळे झाडे वाळत आहे. सिंचनाची व्यवस्था नाही निसर्गाच्या कृपेवर सर्व अवलंबून असल्यामुळे दुसऱ्या वेचनीनंतर कापसाचे पीक संपुष्टात येणार आहे. त्यामुळे कापसावर केलेला खर्च सुद्धा निघणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दिसू लागले आहे. अशा कठीण परिस्थितीत कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, असे संकट उद्भवले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे. त्याच्या शिवाय जीवन जगणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना वाढीव दर देणे आवश्यक आहे. हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांना संकटातून काढू शकतो.शेतकऱ्यांची बिकट स्थितीतून सुटका करण्यासाठी शासनाने खरेदी केंद्र सुरू करून प्रति क्विंटल सहा हजार रुपये दर देण्याची मागणी काँग्रेसचे कार्यकर्ते अ‍ॅड. अरुण धोटे यांनी शासनाकडे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)