शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी युवकास पोलिसांकडून बेदम मारहाण

By admin | Updated: September 2, 2015 00:43 IST

जिल्ह्यातील दारू तस्करीवर आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चंद्रपूर पोलिसांच्या पथकाने निरपराध व्यापारी युवकास सोमवारच्या रात्री अमानुष मारहाण केली.1

चंद्रपूर : जिल्ह्यातील दारू तस्करीवर आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चंद्रपूर पोलिसांच्या पथकाने निरपराध व्यापारी युवकास सोमवारच्या रात्री अमानुष मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ चंद्रपूर चेंबर्स आॅफ कॉमर्स आणि विविध संघटनांनी पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी निषेध रॅली काढण्याची घोषणा केली आहे. निरपराध व्यापारी युवकाला पोलिसांनी नाहक मारहाण केल्याचा आरोप आहे. ही घटना पोलीस खात्याच्या अंगावर शेकण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ व्यापारी संघटनांनी बुधवारी चंद्रपूर बंदचे आयोजन केले होते. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्तीनंतर बंद रद्द करून निषेध रॅली काढण्याचे ठरले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी स्थानिक जैन भवनात व्यापारी संघटना आणि चेंबर आॅफ कॉमर्सची बैठक झाली. यात चंद्रपूर मनपाच्या स्थायी समितीचे माजी सभापती रामू तिवारी, सदानंद खत्री, दामोदर मंत्री, रामकिशोर सारडा, रमेश बोथरा, विनोद बजाज उपस्थित होते. या सभेमध्ये संघटनांच्या विविध प्रतिनिधींनी पोलिसांच्या या भूमिकेचा जोरदार निषेध केला. रोहीत बोथरा हा युवक व्यापारी असल्याचे आणि निर्दोष असल्याचे माहीत झाल्यावरही पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली. हा युवक आपल्या व्यापारासंदर्भातील वसुलीची रक्कम घेवून चारचाकी वाहनाने भद्रावती मार्गे चंद्रपूरकडे रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान परत येत होता. मार्गात भद्रावतीजवळील घोडपेठ या गावापासून रोहितच्या वाहनाचा पाठलाग एका चारचाकी वाहनाने सुरू झाला. विशेष म्हणजे या युवकाचा पाठलाग करणाऱ्या वाहनाला नंबर प्लेटच नव्हती. सायरन अथवा पोलीस विभागाचे कुठलेही चिन्ह लावलेले नव्हते. त्यामुळे आपल्यावर कुणीतरी पाळत ठेवून पाठलाग करीत असावे, असे वाटल्याने रोहीतने आपले वाहन न थांबविता प्रवास सुरूच ठेवला. चंद्रपुरात पोहचल्यावर वाहतूक विभागाच्या कार्यालयाजवळ वाहतूक पोलीस दिसल्याने त्याला धीर आला. त्यामुळे त्याने आपले वाहन थांबविले. मात्र तेवढ्यात पाठलाग करीत असलेल्या वाहनही तिथे पोहचले. त्यातून काही व्यक्ती वेगाने खाली उतरले आणि काही कळायच्या आतच रोहीतला वाहनाबाहेर खेचून मारहाण करायला सुरूवात केली. एवढ्यावरच त्यांचे समाधान झाले नाही, तर त्यांनी त्याला वाहतूक विभागाच्या कार्यालयात खेचत नेवून सुमारे दीड तास मारहाण केली. आपण व्यापारी असून कसल्याही गुन्ह्याशी आपला संबंध नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस काहीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते, असा घटनाक्रम या सभेत सांगण्यात आला. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना रामकिशोर सारडा म्हणाले, व्यापारी नेहमी कायद्याचा सन्मान करतात. मात्र रोहीत बोथरा यांच्यावर झालेला अन्याय सहन न करण्यापलिकडचा आहे. चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी यांनीही या घटनेचा निषेध केला. संचालन मुन्ना भंडारी, यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)आज निषेध रॅलीया घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी २ सप्टेंबरला चंद्रपुरातून निषेध रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीला जैन भवन येथून दुपारी ३ वाजता प्रारंभ होणार असून शहरातील प्रमुख मार्गाने रॅली फिरून जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयावर जाईल. तिथे व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाकडून निवेदन दिले जाईल. या रॅलीमध्ये व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची विनंती चेंबर आॅफ कॉमर्स आणि व्यापारी मंडळांनी केली आहे.