शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
4
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
5
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
7
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
8
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
9
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
10
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
11
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
12
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
13
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
14
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
15
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
16
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
17
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
18
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
19
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
20
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले

बसने विद्यार्थ्याला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 22:53 IST

तुकूम येथील कार्मेल अ‍ॅकेडमी शाळेत शिकत असलेल्या यशराज चांदेकर (८) या विद्यार्थ्याला चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील खासगी स्मिता ट्रॅव्हल्सच्या स्कूलबसने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना दुपारी २.३० वाजता शाळेजवळच घडली. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. यावेळी शिवसेनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करीत मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी केली.

ठळक मुद्देजागीच ठार : बिजेएम कार्मेल अ‍ॅकेडमीजवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तुकूम येथील कार्मेल अ‍ॅकेडमी शाळेत शिकत असलेल्या यशराज चांदेकर (८) या विद्यार्थ्याला चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील खासगी स्मिता ट्रॅव्हल्सच्या स्कूलबसने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना दुपारी २.३० वाजता शाळेजवळच घडली. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. यावेळी शिवसेनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करीत मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी केली.बि. जे. एम. कारमेल अकॅडमी या शाळेची दुपारी २.१५ वाजता सुटी झाली. उर्जानगर वसाहतीत राहणारे विद्यार्थी शाळेबाहेर पडून स्कूल बसची वाट बघत होते. दुपारी २.३० वाजेदरम्यान त्यांची बस शाळाजवळील रस्त्यावर आली. त्या रस्त्यालगत वाळूचा ढिगारा टाकलेला होता. या ढिगाऱ्यामुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यास अडथळा निर्माण झाला. अशातच यशराज चांदेकर (८) हा विद्यार्थी बसमध्ये चढत असताना तोल जाऊन बसच्या मागील चाकाखाली आला. चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याच शाळेत इयत्ता ६ वीत शिकणाऱ्या त्याच्या भावाने याची माहिती आपल्या वडिलांना दिली. या घटनेचे वृत्त पसरताच तिथे मोठी गर्दी झाली. नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला.कुटुंबीयांना ५० लाखशिवसेनेचे नगरसेवक सुरेश पचारे यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सदर घटना शाळेच्या बेजबाबदारपणामुळे घडल्याचा आरोप करीत बिजेएमने मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी लावून धरली. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने मृताच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये तर चंद्रपूर वीज केंद्रानेही २५ लाख आर्थिक मदतीचा धनादेश दिला.