शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञाताने जाळले धानाचे पुंजणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:30 IST

मौजा पांढरवानी शिवारात अज्ञात इसमाने कुंडलिक जयराम गराटे या शेतकऱ्यांच्या शेतातील तीन एकरवरील धानाचे पुंजणे आग लावून जाळून खाक केले.

ठळक मुद्देमोठे नुकसान : पांढरवानी शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनेरी : मौजा पांढरवानी शिवारात अज्ञात इसमाने कुंडलिक जयराम गराटे या शेतकऱ्यांच्या शेतातील तीन एकरवरील धानाचे पुंजणे आग लावून जाळून खाक केले. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.कुंडलिक जयराम गराटे हे नेरी येथील रहिवासी असून पांढरवानी येथे त्यांची तीन एकर शेती आहे. त्यांनी धानाचे रोवणे केले आणि कमी पावसात कसेबसे धानपीक जगविले. कर्ज काढून शेती फुलवली. पीक पण जोमात आले. धानाची कापणी करून गुरुवारी पुंजने तयार केले. परंतु अज्ञात इसमाने या पुंजण्याला आग लावली. यात संपूर्ण पुंजणे जळून खाक झाले. यामुळे गरीब शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी आली आहे. हातात आलेले पीक काही क्षणात जळून खाक झाल्याने त्याच्या कुटुंबावरही मोठा आघात पोहचला आहे. शेती व्यतिरिक्त त्यांच्याकडे उपजीविकेचे दुसरे कुठलेही साधन नाही. शासनाने योग्य चौकशी करून या गरीब शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी व अज्ञात इसमाला पकडून कडक कारवाई करावी, अशी मागणी कुंडलिक गराठे व गावकऱ्यांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच तलाठी प्रवीण गंडमवार यांनी घटनास्थळी जाऊन मौका तपासणी व पंचनामा केला. ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान भरपाई दाखवण्यात आली.