शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२४ हजार लोकसंख्येचा भार एकाच डॉक्टरवर

By admin | Updated: May 25, 2017 00:29 IST

सावली तालुक्यातील अंतरगाव प्राथिमक आरोग्य केंद्रात सहा उपकेंद्र येतात.

अंतरगाव आरोग्य केंद्रातील प्रकार : वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त लोकमत न्यूज नेटवर्कगेवरा : सावली तालुक्यातील अंतरगाव प्राथिमक आरोग्य केंद्रात सहा उपकेंद्र येतात. मात्र या उपकेंद्रात एकच डॉक्टर असल्याने सुमारे २४ हजार ३६५ लोकांचे आरोग्य त्या एका डॉक्टरच्या हातात असल्याने चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची सेवा देणारे प्राथमिक आरोग्य केंद्र आजारी असल्याचे चित्र दिसून येत आहे.या आरोग्य केंद्रात एक एमबीबीएस दर्जाचा वैद्यकीय अधिकारी अपेक्षीत आहे. मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी भोयर प्रशिक्षणासाठी पुणे येथे गेल्याने त्यांच्या जागी वैद्यकीय अधिकाऱ्याचा पदभार विहीरगावच्या उपकेंद्रातील बीएएमएस डॉक्टरांकडे देण्यात आला. तेव्हापासून ३० एप्रिल २०१७ पर्यंत एक उपकेंद्र व पीएचसी आणि शासकीय आरोग्य उपकेंद्राची जबाबदारी एकाच डॉक्टरावर होती. त्यासोबत एक निवासी वैद्यकीय अधिकारी अपेक्षित होता. मात्र ३० एप्रिलला प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवारत असलेले डॉ. उरकुडे यांची सेवानिवृत्ती झाली. तेव्हापासून वैद्यकीय अधिकाऱ्याविनाच हे केंद्र सुरू आहे. शासनाचे या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. परिणामी या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कुणाचेही नियंत्रण नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. या ठिकाणी असलेली रुग्णवाहिका अनेक महिण्यांपासून बिघडलेली आहे. सहा उपकेंद्रातून प्रसृतीकरिता किंवा आजारी रुग्णांना हलविण्यासाठी एकही रुग्णवाहिका नाही. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळू शकत नाही. परिणामी रुग्णांचे आरोग्य धोक्यात आहे.तसेच कडक उन्ह तापत असूनसुद्धा आरोग्य केंद्रातील एकही कुलर सुरू नाही. त्यामुळे रुग्णांना तसेच ग्रामीण भाग असल्याने वेळी अवेळी विद्युत सेवा खंडीत होत असते. मात्र येथील इन्वर्टर अनेक महिन्यांपासून बंद आहे. सदर आरोग्य केंद्र हे मागील १० ते ११ वर्षापासून २४ बाय ७ (आयपीएचएस)अंतर्गत सेवा देणारे केंद्र म्हणून विविध स्तरावरुन निधी पुरविला जातो. परंतु २४ बाय ७ अशी आरोग्य सेवा या परिसरातील रुग्णांना कधीही मिळाली नसल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. परिणामी परिसरातील नागरिकांना खासगी रुग्णालयाच आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे अधिक पैसे खर्च होत आहेत.विहिरगाव येथे एक उपकेंद्र आहे. तिथे बऱ्याच वर्षापासून एक परिचर रुग्णांवर उपचार करीत होता. येथील डॉक्टरांकडे पीएचसीचा वैद्यकीय अधिकाऱ्याचा पदभार होता. मात्र ते आता सेवानिवृत्त झाले.व परिचर सेवा बढतीने स्थानांतरण झाले. त्यामुळे हे उपकेंद्र केवळ एका आरोग्य सेवीकेवर अवलंबून आहे. एक आरोग्य सेवक सोबतीला घेवून हे उपकेंद्र चालविण्याची नामूष्की आरोग्य विभागावर आली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून शासनाने या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे, पायाभूत सुविधांची पूर्तता करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.