शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

घोडाझरीने टाकली कात

By admin | Updated: July 31, 2016 00:48 IST

पूर्व विदर्भात एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध पावलेल्या घोडाझरीने आणखी कात टाकली आहे.

बोटिंगचा आनंद : निवास व इतर सुविधांची रेलचेलनागभीड : पूर्व विदर्भात एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध पावलेल्या घोडाझरीने आणखी कात टाकली आहे. घोडाझरीत अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या असून या सुधारणा पर्यटकांना भूरळ घालत आहेत.तसेही घोडाझरीचे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना भूरळ घालणारेच आहे. तिन्ही बाजुला नैसर्गिक टेकड्या असल्याने एका बाजूला बांध घालून इंग्रजांनी या तलावाची निर्मिती १९०५ मध्ये केली. तलावाची निर्मिती केली त्यावेळी परिसरातील शेतकऱ्यांना सिंचन उपलब्ध व्हावे, अशी इंग्रजांची कल्पना असावी. पण आता हे तलाव नागभीड - सिंदेवाही या तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीस सिंचन तर उपलब्ध करून देतच आहे. पण त्याच बरोबर हे तलाव पूर्व विदर्भातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आले आहेत. म्हणूनच वर्षभर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आदी जिल्ह्यातील पर्यटक भेट देत असतात. या जिल्ह्यातील शाळांच्या सहलीही येत असतात.सद्यस्थितीत घोडाझरीच्या व्यवस्थापनाने घोडाझरीत आणखी नव्याने अनेक सोयी उपलब्ध केल्या आहेत. यात विविध प्रकारच्या बोटिंगचा समावेश आहे. आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. आतापर्यंत नसलेली निवासाची व्यवस्था आता उपलब्ध करण्यात आली आहे. आधीच वृक्षवेलींनी बहरलेल्या बगिच्यात आकर्षक झाडांची लागवड करण्यात आली आहे. विशाल अशा तलावाचा आणि त्यासमोरील हिरव्या गर्द वनराईमध्ये बसून तिचा मनमुराद आनंद लुटता यावा, यासाठी गवताच्या झोपड्यांची निर्मिती करण्यात आली आहे.घोडाझरीचे बदललेले हे स्वरूप खरोखर डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून ‘इको टुरिझम’ म्हणून घोडाझरीचा संपूर्ण जंगल परिसर विकसित करण्यात येत आहे. वन विभागाचे हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. वन विभागाच्या या इको टुुरिझमने पर्यटकांना अनासायास दुग्धशर्करा योगाचा लाभ होणार आहे. (तालुका प्रतिनिधी) एकाच दिवशी जंगलभ्रमंतीया जंगलभ्रमंतीत जंगली पशुपक्षांचे दर्शन आणि घोडाझरीच्या नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन पर्यटकांना अनुभवता येणार आहे.