शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणावर चालणार बुलडोजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2017 00:50 IST

मंगळवारी दुपारी महापौर अंजली घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली मनपाची सर्वसाधारण सभा पार पडली.

मनपाची सर्वसाधारण सभा : वाढीव क्षेत्राच्या विकास योजनेस मंजुरीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मंगळवारी दुपारी महापौर अंजली घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली मनपाची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत शहरातील वाढीव क्षेत्राच्या विकास योजनेस मंजूरी व अवैधरित्या करण्यात येत असलेले बांधकाम हटविण्यास मंजुरी देण्यात आली. सभेला उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, आयुक्त संजय काकडे उपस्थित होते. सभेत पावसाळ्यापूर्वी मोठ्या नाल्यावरील अतिक्रमण, शहरातील नर्सिंग होम तसेच आऊटडोर क्लिनीकची नोंदणी, नूतनीकरण शुल्क ठरविणे, आदर्श वॉर्ड स्पर्धा राबविण्याचे धोरण ठरविणे, मनपा शाळा डिजिटल करणे, अग्निशमन विभागातील मंजूर पदाचे सेवाप्रवेश नियम शासनाकडे मंजुरीकरिता पाठविणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.याप्रसंगी महापौर घोटेकर यांनी, पावसाळ्यापूर्वी शहरातील मुख्य नाल्यावरील अतिक्रमण काढण्याचे काम सुरु आहे. बरेच अतिक्रमण पथकाने काढले आहे. पोलीस बंदोबस्त वेळेवर न मिळाल्याने काही ठिकाणचे अवैध अतिक्रमण काढता आले नाही, असे सांगितले. तसेच पावसाळा सुरु झाल्याने लोकांना बेघर करता येत नसल्याने अतिक्रमणाची कार्यवाही पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहे. परंतु ज्या प्लॉटधारकांनी बांधकामाची परवानगी न घेता बांधकाम केले तसेच बांधकाम मंजुरी घेऊन नियमानुसार बांधकाम न करता अतिरिक्त बांधकाम करणाऱ्या बांधकाम धारकांवर अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, असे महापौर यांनी सांगितले. अकृषक ले-आऊट मध्ये ज्यांनी बांधकाम केलेले आहे. त्यांनी बांधकाम नियमित करण्यासाठी गुंठ्ठेवारी तत्वावर प्रकरण दाखल करुन घराच्या बांधकामाची मंजुरी घ्यावी व अवैध बांधकाम नियमाकुल करावे तसेच विवेकनगरातील पाच मजली इमारत अवैध असल्याबाबत तसेच राधाकृष्ण सभागृह, शकुंतला लॉन, खुल्या जागेवरील अवैध बांधकाम याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. नगर अभियंता, झोनल अभियंता यांना त्यांचे झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभागातील अवैध बांधकामाची यादी तयार करुन त्यावर त्वरीत बांधकाम निष्कासीत करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश महापौर घोटेकर यांनी दिले. आदर्श वार्ड योजना उत्तम आहे. सर्व नगरसेवकांनी आप आपल्या प्रभागातील समस्या जाणून त्या सोडवाव्या व आपला प्रभाग आदर्श बनवावा. विविध प्रभागात डुक्कर, मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. काही ठिकाणी डुकरांची कत्तल करुन मांस विक्री होत आहे. अशा व्यावसायिकावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, असेही निर्देश महापौर घोटेकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.मनपा शाळांची डिजिटलकडे वाटचाल महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेच्या दर्जा उंचविण्यासाठी मनपाच्या शाळा डिजिटल करण्याचे काम सुरु आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेक्स-बेंचची व्यवस्था करण्यात येत असून गणवेश, बूट, पायमोचे देण्यात येणार आहेत. शाळेला रंगरंगोटी करण्याचा प्रस्ताव तयार करुन शासनाकडे पाठविण्यात येणार असून यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विशेष निधी उपलब्ध करुन देणार आहेत. त्यामुळे आता मनपाच्या प्राथमिक शाळा खाजगी शाळेसारख्या डिजिटल होणार असल्याचे महापौर घोटेकर यांनी सभेत सांगितले. नर्सिंग होमवर होणार कार्यवाहीचंद्रपूर शहरातील नर्सिंग होमचे आऊटडोर क्लिनिकची नोंदणी, नूतनीकरण आधी जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्याकडे होत होते. परंतु, शासनाच्या परिपत्रकानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिका झाल्याने अशा दवाखान्यांची नोंदणी व नूतनीकरण हे मनपाकडे एमओएचच्या अधिनियमातर्गंत करण्यात येणार आहे. नोंदणी व नूतनीकरण न करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार आहे.घरगुती जागेत काही डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. तेथे पार्किंगची व्यवस्था नाही व संबंधीत ले-आऊट धारकांचे नाहकरत प्रमाणपत्र न घेता अवैध रित्या नर्सिंग होम सुरु केलेले आहे. अशा अवैध दवाखान्यावर महाराष्ट्र (मुंबई) सुश्रृषा अधिनियमाअंतर्गत कार्यवाही करण्यात येईल. दे. गो. तुकूम शाळेचे नामकरणमनपाच्या दे. गो. तुकूम प्राथमिक शाळेला पंडीत दिनदयाल उपाध्याय प्राथमिक शाळा असे नाव देण्यास सभागृहाने सर्व सहमतीने मंजूरी दिली. त्यामुळे या शाळेचे आता नव्याने नामकरण झाले आहे.