जागा अनिश्चित : नव्याने नगर परिषदेची स्थापनाघनश्याम नवघडे । लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : येथील नगर परिषदेसाठी भाड्याने इमारत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र इमारत भाड्याने घेताना ती कोठे घ्यावी, यावर विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.नागभीड येथे या आधी ग्रामपंचायत होती. साजेशा अशा इमारतीमध्ये ग्रामपंचायतचा कारभार सुरू होता. पण मागील वर्षी ११ एप्रिल २०१६ रोजी नगर परिषदेची स्थापना करण्यात आली. एव्हढेच नव्हे तर या ठिकाणी नुकतेच नगर परिषदेचे लोकनियुक्त कार्यकारी मंडळही अस्तित्वात आले आहे. कारभाराच्या दृष्टीने ग्रामपंचायतच्या तुलनेत नगर परिषदेचा पसारा मोठा असल्याने नगर परिषदेचा कारभार चालविणे सध्याच्या इमारतीत अशक्य आहे. म्हणून नव्या पदाधिकाऱ्यांकडून चांगल्या आणि सुसज्ज तसेच नगर परिषदेला उपयुक्त अशा इमारतीचा शोध घेणे सुरू असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे. नव्या इमारतीस कोणाचाही विरोध नसल्याचे सांगण्यात येते. ती इमारत योग्य ठिकाणी असावी. पार्किंगची भरपूर सोय असावी आणि परिसरातील लोकांना त्रास होवू नये अशी मते यासंदर्भात सुचविण्यात येत आहे. एकंदर या मुद्यावरच नागभीड येथे या चर्चेचे चांगलेच चर्वित चर्वण होत आहे. असे असले तरी नगर परिषदेचे कार्यकारी मंडळ भाड्याच्या इमारतीबद्दल काय निर्णय घेते, यावर नवी इमारत अवलंबून आहे.स्वत:ची नवीन इमारत बांधण्याची सूचनायासंदर्भात थोडासा कानोसा घेतला असता नागरिक आणि नगरसेवकांकडून विविध मते मांडण्यात येत आहेत. काहींच्या मते राजीव गांधी सभागृहाची डागडुजी करून तेथेच नगर परिषदेचा संसार थाटावा. काहींना वाटते की, एखादे मंगल कार्यालयच भाड्याने घ्यावे. जर इमारतीचा निधी प्राप्त असेल तर वर्षभरात नवीन इमारत उभी करावी. तोपर्यंत जुन्याच इमारतीत दिवस काढावे, अशा प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केल्या. सध्या अस्तित्वात असलेली इमारत नगर परिषदेच्या दृष्टीने अपूर्ण आहे. कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्थित बैठक व्यवस्था नाही. समित्यांना कोठे जागा द्यावी, हा प्रश्नच आहे. सभागृहसुद्धा योग्य नाही. म्हणून नवीन इमारतीचा शोध घेणे सुरू आहे. सर्व बाबतीत योग्य अशी इमारत मिळाली तर आम्ही निश्चित विचार करू.- प्रा.डॉ. उमाजी हिरे,नगराध्यक्ष, नागभीड
इमारत भाड्याने घेण्याच्या हालचाली सुरू
By admin | Updated: June 14, 2017 00:27 IST