लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महावीरनगर झोपडपट्टी, शहीद करकरे चौक आणि बाबूपेठ परिसरात मागील ४० वर्षांपेक्षा जास्त काळापासून कुटुंबांसह वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टीधारकांना केंद्र सरकारच्या धोरणानुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्याच जागेवर महानगरपालिका व राज्य सरकारच्या माध्यमातून कायमस्वरुपी पट्टे देऊन घरे बांधून द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी प्रसिद्धिपत्रकातून केली आहे.नागभीड दक्षिण पूर्व रेल्वेने १५ नोव्हेंबर २०१७ ला झोपड्या हटविण्यासंबंधी पत्र दिले. शिवाय, जे. सी. बी. आणि कामगारांची मदत मागितली. महानगरपालिका व एमएसईबीला पिण्याच्या पाण्याचे नळ व विद्युत कनेक्शन तोडण्यासंबंधीही विनंती केली आहे.परंतु, रेल्वे प्रशासनाचे हे धोरण केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमाविरूध्द आहे.गोरगरीब जनतेला त्यांचा निवारा काढून घेण्याबाबतचे जे पत्र दिले आहेत. ते केंद्र सरकारच्या धोरणाच्या आदेशाचे उल्लंघन करणारे आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारच्या मालकीच्या जमिनीवर अशा प्रकारच्या झोपड्या असतील, तर त्यांचे पूर्नवसन करावे. ज्या पात्र व्यक्तींना एक लाख रूपये अनुदान केंद्र सरकार देणार आहेत. अथवा एखादी खासगी एजन्सी केंद्र व राज्य सरकारच्या संमतीने जागा विकसित करू इच्छित असेल, तर त्याकरिता जमिनीची किंमत न लावता पात्र लोकांना घरे बांधून द्यावी, अशी मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केली आहे. मात्र, रेल्वे विभागाने गरीबांच्या झोपड्या तोडून अन्याय केल्यास त्याविरुद्ध आवाज उठवू, असेही नरेश पुगलिया यांनी म्हटले आहे.
झोपडपट्टीधारकांना घरे बांधून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:30 IST
महावीरनगर झोपडपट्टी, शहीद करकरे चौक आणि बाबूपेठ परिसरात मागील ४० वर्षांपेक्षा जास्त काळापासून कुटुंबांसह वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टीधारकांना केंद्र सरकारच्या धोरणानुसार....
झोपडपट्टीधारकांना घरे बांधून द्या
ठळक मुद्देनरेश पुगलिया : रेल्वे प्रशासनाने गरिबांवर अन्याय करू नये