शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदीवरील शिवणी येथे बंधारा बांधावा

By admin | Updated: May 27, 2016 01:12 IST

वर्धा नदीपट्टयातील शेतीला सिंचनाची सुविधा व्हावी, परिसरातील गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा,

चार तालुक्यांना लाभ : शासनाच्या दुर्लक्षाने गावकऱ्यांत रोषचंद्रपूर : वर्धा नदीपट्टयातील शेतीला सिंचनाची सुविधा व्हावी, परिसरातील गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, या उद्देशातून चंद्रपूर शहरापासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवणी (बोर) येथे वर्धा नदीवर बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यापूर्वी नागरिकांनी स्वाक्षरी अभियान राबविले. परंतु, शासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने परिसरातील गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.वर्धा नदीपट्टयातील जमीन सुपीक आहे. परिसरात सिंचनाची सुविधा झाल्यास तेथील शेती समृद्ध होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू शकते. परंतु, सद्य:स्थितीत परिसरात सिंचनाची सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. २० वर्षांपूर्वी या परिसरात हडस्ती, धानोरा (पिपरी) आणि शिवणी (चोर) येथे वर्धा नदीवर उपसा जलसिंचन योजना कार्यरत होत्या. परंतु, कालांतराने या तिन्ही योजना बंद पडल्या. तेव्हापासून या परिसरातील शेतकरी निसर्गावर अवलंबून शेती करीत आहेत.शिवणी येथे वर्धा नदीवर बंधारा झाल्यास भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होईल. नदीकाठावरील राजुरा, कोरपना या तालुक्यातील गावांसोबतच चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यातील काही गावांना सिंचनाची सुविधा होईल. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सुटेल. यासाठी येथे बंधारा बांधण्यात यावा म्हणून परिसरातील शिवणी, धिडशी, चार्ली, निर्ली, पेल्लोरा, किनबोडी, कढोली येथील गावकऱ्यांनी स्वाक्षरी अभियान राबविले होते. परंतु, शासनाने येथील नागरिकांच्या मागणीची दखल घेतलेली नाही. २००३ मध्ये शिवणी, मार्डा परिसरात बॅरेज बांधकामासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. परंतु पुढे या कामाचे काय झाले, हे कुणालाच माहीत नाही. त्यामुळे शिवणी येथे बंधारा बांधून नागरिकांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष उमाकांत धांडे यांनी केली आहे.शिवणी येथे बंधारा झाल्यास मार्डा, धिडसी, चार्ली, निर्ली, साखरी, पेल्लोरा, वरोडा, किनबोडी, कुर्ली, हडस्ती, कढोली, जैतापूर, भोयगाव, पिपरी, धानोरा आणि परिसरातील अन्य गावांना लाभ होणार आहे. त्यामुळे बंधारा बांधकामाला मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी उमाकांत धांडे यांच्यासह चार्लीच्या सरपंच पौर्णिमा दुबे, उपसरपंच किशोर ढुमणे, पेल्लोराचे उपसरपंच किशोर ढुमणे, पेल्लोराचे उपसरपंच भोयर, प्रमोद धांडे, जयश्री धांडे, सावित्री पंधरे, सुनीता वराटे, ताराताई कौरासे, संदीप डाखरे, लक्ष्मणराव एकरे, रवींद्र चटके, निमणीचे सरपंच गजानन भोंगळे, विनोद झाडे, संजय उमरे, रामदास उपरे, रमेश झाडे, बळीराम वैद्य, मंगेश भोयर, सुरेश पोडे, दौलतराव घटे, उत्तम बोबडे, वरोडाचे सरपंच साईनाथ देठे, नत्थू बोबडे, लहू भोयर, कवडू कौरासे, कवडू गोरे, सुरेश वराटे, गजानन एकरे, हेमराज जेनेकर, दीपक पाचभाई, पोवनीचे श्रावण मालेकर, निळकंठ दुबे, सुनील वनकर, नंदकिशोर कौरासे, पंकज दुबे, सुनील जीवतोडे, रामदास पंधरे, अनिल बहिरे, दत्ता तुराणकर, लटारी आवारी, अनिल तुरणकर, सुदर्शन क्षीरसागर, संजय गोरे, संबाशिव लाडे, कवडू पोडे, बाळा धांडे, संजय चटके, सुरेश ढुमणे, अनिल आस्वले, किशोर धांडे, डॉ. अरविंद ठाकरे, प्रा. देवराव ठावरी, दीपक पाचभाई, अशोक वासाडे, विवेक गोखरे, गणेश जोगी, राकेश गोखरे, बबन पारखी यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)