शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी जिल्ह्याची निर्मिती करावी

By admin | Updated: August 26, 2015 00:55 IST

ब्रह्मपुरी या नव्या जिल्ह्याची मागणी चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन्ही जिल्हे एकत्रित असतापासूनची आहे.

विजय वडेट्टीवार यांची मागणी : मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांना निवेदन चंद्रपूर : ब्रह्मपुरी या नव्या जिल्ह्याची मागणी चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन्ही जिल्हे एकत्रित असतापासूनची आहे. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यापूर्वी तत्कालिन सरकारने ब्रह्मपुरी जिल्ह्याची घोषणा सुद्धा केलेली होती. ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी फार जुनी असून येथील जनतेने वारंवार आंदोेलन, मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे जनतेच्या मागणीचा विचार करता चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करुन नव्याने ब्रह्मपुरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, महसूल मंत्री एकनाथराव खडसे, प्रधान सचिव महसूल यांना दिलेल्या लेखी निवेदनातून केली आहे.आमदार विजय वडेट्टीवार निवेदनात म्हटले आहे, राज्यात नव्याने २२ जिल्ह्याची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करुन नवे जिल्हे निर्माण करणे हे जनतेच्या आणि प्रशासकीय सेवेच्या दृष्टीने सोेईचे आहे. ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी फार जुनी असून ब्रह्मपुरी जिल्हा घोषीत झाल्यास अनेकांच्या सोयीचे ठरणार आहे. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली त्यापूर्वी तत्कालिन सरकारने ब्रह्मपुरी जिल्ह्याची घोषणा सुद्धा केली होती. मात्र ही घोषणा हवेत विरली. चंद्रपूर जिल्हा मुख्यालय येथील नागरिकांसाठी गैरसोयीचे आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी नवा जिल्हा स्थापन झाल्यास सिंदेवाही, नागभीड, चिमूर, सावली, ब्रह्मपुरी येथील नागरिकांसाठी सोयीचे ठरणार आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)