शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

भद्रावती येथे बौद्ध महोत्सव

By admin | Updated: November 2, 2016 00:56 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा वर्षावास समपना निमित्त ..

भदन्त राहुल बोधी : आज जगाला बुद्धांच्या शांतीमय विचारांची आवश्यकताभद्रावती : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा वर्षावास समपना निमित्त ऐतिहासिक विंजासन बुद्ध लेणी, भद्रावती येथे दोन दिवसीय विराट बौद्ध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन विंजासन बुद्ध लेणी वर्षावास समिती भद्रावतीच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदन्त डॉ. राहुल बोधी (विपश्यनाचार्य) मुंबई तर उद्घाटक म्हणून डॉ. वाणास्वामी महास्थाविर, अरुणाचलप्रदेश हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून भदन्त सदानंद महास्थवीर केळझर, भदन्त सत्यशिल महास्थवीर नगापूर, भदन्त खेमधम्मो महास्थविर नागपूर, भदन्त कृपाशरण महास्थविर चंद्रपूर, इंद्रेश गजभिये भोपाल, उपासक सन्नी थायलंड, दिनेश पाटील, डॉ. चंद्रबोधी नाईक, डॉ. पुरण मेश्राम, प्रो. डॉ. सुरजित सिंग तसेच समितीचे मार्गदर्शक विनयबोधी डोंगरे, सिद्धार्थ सुमन, अध्यक्ष लिनता जुनघरे, निलेश पाटील, संजय खोब्रागडे उपस्थित होते. या कार्यक्रमाला ५० भिक्खुसंघ उपस्थित होते.उद्घाटनपर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनयबोधी डोंगरे, संचालन सिद्धार्थ सुमन तर आभार संजय खोब्रागडे यांनी मानले. त्यानंतर उपस्थित सर्व भिक्खु संघांना चिवरदान करण्यात आले. भिक्खुसंघास भोजनदान डॉ. बि. प्रेमचंद व डॉ. माला प्रेमचंद भद्रावती यांच्या वतीने करण्यात आले.दुसऱ्या सत्रात धम्मसंवाद व समारोपीय कार्यक्रम पार पडला. बौद्ध शासनात वर्षावासाचे महत्त्व व प्रासंगिकता यावर प्रा. डॉ. सुरजीतसिंग वर्धा यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सिद्धार्थ सुमन, संचालन संतोष रामटेके तर आभार जयदेव खाडे यांनी मानले. कार्यक्रमाला बौद्ध उपासक, उपासिका उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)समाजाला बदलण्यासाठी आधी स्वत:ला बदलाआदर्श बौद्ध समाज निर्माण करणे आवश्यक आहे. समाजाला बदलवायचे असेल तर पहिले स्वत:ला बदलले पाहिजे. कुटुंब हा समाजाचा आधार आहे. कुटुंब बदलले पाहिजे आणि यासाठी स्वत:पासून सुरुवात करा, असे आवाहन भदन्त डॉ. राहुल बोधी यांनी यावेळी केले. बौद्ध महोत्सवाच्या माध्यमातून एकत्रीत येवून धम्मचर्चा करणे, ही मंगलमय व जीवनात प्रकाश टाकणारी बाब आहे. धम्म श्रवण व पालन सर्वानी करावे, असेही ते म्हणाले. बौद्ध धम्म सागरा सारखा आहे. त्याला तलावासारखे बनवू नका. विहार हे शिक्षणाचे, प्रशिक्षणाचे, धम्माचे केंद्र आहे. तिथे दर रविवारी गेलेच पाहिजे असा आग्रहही त्यांनी धरला.