चंद्रपूर : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे शेतकरीविरोधी आहेत. त्यामुळे हे कायदे रद्द करण्यात यावे, दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती करावी, खाद्यतेलाचे दर कमी करण्यात यावे, चुकीच्या धोरणांमुळे जीडीपीत सततची घसरण होत आहे. याविरोधात राज्यभरात डॉ. सुरेश माने यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर येथे धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी बीआरएसपीचे युवा आघाडी मोंटू मानकर, अध्यक्ष राजू रामटेके, महासचिव अमोल जुनघरे, महासचिव धम्मदीप बांबोळे, जिल्हा महासचिव सुरेश पाईकराव, अशोक आमपल्लीवार, अशोक भगत, महिला आघाडीच्या ज्योत्सना डांगे आदी उपस्थित होते.