चंद्रपूर : येथील एआरटीओ कार्यालय शुक्रवारी पुन्हा नव्या घटनेमुळे चर्चेत आले. कार्यालयाच्या परिसरात वावरणारा दलाल आणि वाहतूक निरीक्षकात परवान्याच्या विषयावरून भांडण झाले. या भांडणाचा शेवट फ्री स्टाईलमध्ये होऊन प्रकरण पोलिसात पोहोचले.शुक्रवारी दुपारच्या दरम्यान सुनील दुरटकर नामक दलालाचा येथील वाहतून निरीक्षक माळवे यांच्याशी वाद एवढा विकोपाला गेला की, वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. अखेर मध्यस्थी करून सुटलेले भांडण रामनगर पोलिसात पोहोचले.या प्रकरणी दोघांनीही एकमेकांविरूद्ध तक्रारी दाखल केल्या. मात्र दलाल दारूच्या नशेत असल्याने पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. या संदर्भात सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कुकडे यांच्याशी संपर्क साधला असता, असा प्रकार घडल्याचे त्यांनी मान्य केले. यामागे नेमके कारण काय होते, हे आपणास माहीत नसल्याचे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)
दलाल आणि साहेबात फ्री स्टाईल
By admin | Updated: January 3, 2015 00:51 IST