शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विभागाचे ब्रिटिशकालीन निवासस्थान वाºयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:47 IST

ब्रिटिशकालीन सिंदेवाही घोडाझरी सिंचन उपविभागाच्या उपविभागीय अधिकाºयांच्या निवासस्थानाची दूरवस्था झाली असून त्याकडे चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देदुरवस्था : पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

बाबुराव परसावार।लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : ब्रिटिशकालीन सिंदेवाही घोडाझरी सिंचन उपविभागाच्या उपविभागीय अधिकाºयांच्या निवासस्थानाची दूरवस्था झाली असून त्याकडे चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे.मागील दहा-बारा वर्षांपासून या विभागाचे उपविभागीय निवासस्थान व कार्यालयीन इमारतीच्या बांधकामाकडे तसेच परिसर स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने कार्यालयीन इमारत व निवासस्थानाच्या सभोवताल अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. ब्रिटीश राजवटीत सिंदेवाही येथील हे एकमेव सुंदर व आकर्षक शासकीय निवासस्थान होते. या निवासस्थानाला १५० वर्ष पूर्ण होत आहे. या काळात घोडाझरी तलावाची निर्मिती झाली. तलावाचे काम बघण्यासाठी ब्रिटिश अधिकारी सिंदेवाही मुख्यालयात राहत होते. सिंदेवाहीवरून घोडेस्वार होऊन ते घोडाझरीला जात होते. या निवासस्थानाच्या मागच्या बाजुला ब्रिटिशांनी घोडे बांधण्याकरिता स्वतंत्र खोलीची व्यवस्था केली होती. तसेच निवासस्थानापुढे व मागे बगीचा तयार केला होता. बैठकीकरिता एक मोठी खोली आहे. आता ब्रिटीशकालीन हे शासकीय निवासस्थान जीर्ण झाल्यामुळे त्याठिकाणी पाटबंधारे विभागाने नवीन निवासस्थान व कार्यालयीन इमारतीचा प्रस्ताव पाठविला होता. नवीन इमारत झाल्यास ब्रिटीशकालीन इमारतीचा ठेवा नष्ट होईल. या उपविभागतंर्गत नवीन निरीक्षणगृह बांधण्यात आले होते. त्या निरीक्षण गृहात २५ वर्षांपूर्वी मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार व वरिष्ठ शासकीय अधिकारी थांबत होते. परंतु पाटबंधारे विभागाने निरीक्षणगृहातच उपविभागीय कार्यालय थाटले आहे. त्यामुळे निरीक्षणगृह (विश्रामगृह) बंद झाले.निरीक्षणगृहातील बगिचा ओसाडसिंदेवाही नगराच्या सौंदर्यात भर घालणाºया येथील घोडाझरी निरीक्षणगृहाजवळील बगिच्याची दुर्दशा झाली असून याकडे संबंधित अधिकाºयांचे दुर्लक्ष झाले आहे. येथील निरीक्षणगृह व बगिचा हे सिंदेवाहीकरांचे आकर्षण होते. परंतु घोडाझरी सिंचन उपविभागीय कार्यालयाची जुनी इमारत जीर्ण झाल्यामुळे उपविभागीय कार्यालय निरीक्षणगृहात स्थानांतरित करण्यात आले. पूर्वी या निरीक्षण गृहात पर्यटकांची सतत वर्दळ असायची. निरीक्षणगृह बंद झाल्यामुळे या निरीक्षण गृहासमोरील बगिचा ओसाड झाला आहे. त्याला आता जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या बगिच्यातील विविध प्रकारची फुलझाडे नष्ट झाली आहेत. बगिच्यात सर्वत्र गवत व झाडे वाढली आहेत. आता या बगिच्यात कुणीही फिरकत नाही. याशिवाय घोडाझरी वसाहत परिसरात पथदिवे बंद आहेत.उपविभागीय कार्यालय रामभरोसेतीन तालुक्यांचा कार्यभार सांभाळणाºया ब्रिटीशकालीन सिंदेवाही येथील घोडाझरी सिंचन उपविभागीय कार्यालय मागील पाच वर्षांपासून रामभरोसे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. घोडाझरी उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी कार्यरत आहे. परंतु ते मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे कार्यालयात शुकशुकाट पसरलेला असतो. उपविभागीय अधिकारी कागदपत्रावर सह्या करून मोकळे होतात. सिंदेवाही येथील घोडाझरी सिंचन उपविभागाअंतर्गत सिंदेवाही, नवरगाव, नागभीड, गोविंदपूर, मेंडकी, सिंचाई शाखा कार्यरत आहेत. या उपविभागातंर्गत एक घोडाझरी मध्यम प्रकल्प तर कुसर्ला, चिंधी अड्याळमेंढा, मुडसा, करोली, गडमौशी, पवनपार, मरेगाव, खैरी ९ लघु प्रकल्प तर २४ मामा तलाव मिळून एकुण ३४ तलावांचा समावेश आहे. सर्व तलावाच्या पाण्याने सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी तालुक्यातील हजारो हेक्टर शेतजमीन ओलीत होते. पूर्वी कालवा निरीक्षक शेतकºयांकडून पानसारा वसूल करीत होते. परंतु शासनाने वसुलीचे अधिकार पाणी वाटप समितीकडे दिले आहे. या कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत, हे विशेष.