शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोषसिद्धीमध्ये जिल्हा पहिल्या क्रमांकावर पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 01:00 IST

पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांना शासन करण्यामध्ये आघाडी घेतली आहे. दोषसिद्धीमध्ये जिल्ह्याचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक आहे. पोलीस प्रशासनामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व सोईसुविरधा उपलब्ध केल्या जात आहेत.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : मूलमधून सायबर क्राईम जनजागृतीचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांना शासन करण्यामध्ये आघाडी घेतली आहे. दोषसिद्धीमध्ये जिल्ह्याचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक आहे. पोलीस प्रशासनामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व सोईसुविरधा उपलब्ध केल्या जात आहेत. पोलीस दलामध्ये कार्यक्षमताही प्रचंड आहे. त्यामुळे आगामी काळात चंद्रपूर पोलीस प्रशासनाने दोषसिद्धीमध्ये जिल्ह्याला प्रथम क्रमांकावर पोहोचवावे, असे आवाहन राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.मूल येथील मा.सा. कन्नमवार स्मृती सभागृहामध्ये शुक्रवारी नागरी सुरक्षा दलाला सायकल वाटप तसेच पोलीस ठाण्यांना बॅरिकेट्स वाटप व सायबर क्राईम जनजागृती उपक्रमाची सुरुवात पोलीस प्रशासनाने केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत उपस्थित होते. मूल, राजुरा, गडचांदूर या भागासाठी मिळणाºया नक्षल निधीतून हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी जिल्हाभरातून आलेल्या नागरिक सुरक्षा समितीच्या सदस्यांना सायकल वाटप करून संबोधित केले. पोलीस विभागाला जिल्ह्यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून नागरी सुरक्षा दलामार्फत पोलिसांच्या कार्यक्षमतेत निश्चितच भर पडणार आहे. येणाºया काळामध्ये जिल्ह्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेºयाचे जाळे घट्ट केले जाईल. त्यामुळे गुन्हेगारांचा शोध घेणे सुलभ होईल. महाराष्ट्राच्या पोलीस विभागातील ज्या काही अद्यावत सुविधा असतील, त्या सर्व चंद्रपूर पोलीस प्रशासनाला मिळेल, अशी ग्वाहीही ना. मुनगंटीवार यांनी दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमराज सिंह राजपूत यांनी तर संचालन पोलीस निरीक्षक विकास मुंडे यांनी केले.चित्ररथाद्वारे सायबर जनजागृतीमोबाईलवर येणारे फसवे मेसेज, एटीएमवरून होणारी फसवणूक, बँकेच्या अकाऊंट संदर्भात मागितली जाणारी माहिती, महिला, बालके वरिष्ठ नागरिकांची मोबाईलवरून होणारी फसवणूक यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जनजागृतीला सुरुवात केली आहे. यासाठी एक सुसज्ज चित्ररथ तयार करण्यात आला असून यामध्ये अनेक माहितीपट दाखविले जाणार आहे. सोबतच जिल्हा पोलीस प्रशासनाने सायबर क्राईम जनजागृती संदर्भात मोठ्या प्रमाणात साहित्य तयार केले असून त्याचे वाटप सुद्धा ग्रामीण भागात केले जाणार आहे. यासंदर्भातील एका चित्ररथाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखविली.मोबाईलवर येणारे फसवे मेसेज, एटीएमवरून होणारी फसवणूक, बँकेच्या अकाऊंट संदर्भात मागितली जाणारी माहिती, महिला, बालके वरिष्ठ नागरिकांची मोबाईलवरून होणारी फसवणूक यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जनजागृतीला सुरुवात केली आहे. यासाठी एक सुसज्ज चित्ररथ तयार करण्यात आला असून यामध्ये अनेक माहितीपट दाखविले जाणार आहे. सोबतच जिल्हा पोलीस प्रशासनाने सायबर क्राईम जनजागृती संदर्भात मोठ्या प्रमाणात साहित्य तयार केले असून त्याचे वाटप सुद्धा ग्रामीण भागात केले जाणार आहे. यासंदर्भातील एका चित्ररथाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखविली.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार