शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

बालमृत्यू दर शून्यावर आणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 22:41 IST

राज्यातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारा जिल्हा निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील.

ठळक मुद्देअधिकाºयांची बैठक : लोकमत’च्या वृत्तमालिकेची पालकमंत्र्यांकडून दखल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारा जिल्हा निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील. मात्र गरिबांच्या तक्रारी येता कामा नये, जिल्ह्यातला बाल मृत्यूदर शून्यापर्यंत नेण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयापासून ग्रामीण भागातील संपूर्ण आरोग्य व्यवस्था बळकट करा, अशी सूचना राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.‘लोकमत’मधून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जिल्हा सामान्य रूग्णालयातील समस्यांच्या वृत्तमालिकेची दखल घेत पालकमंत्र्यांनी बुधवारी रात्री आरोग्य अधिकाºयांची बैठक घेतली. गेल्या काही दिवसात जिल्हा सामान्य रुग्णालय व अन्य आरोग्य यंत्रणेबाबत नागरिकांकडून तक्रारी आल्या आहेत. त्यातील वैद्यकीयदृष्टया आकडेवारीमध्ये न जाता जिल्ह्यातील नवजात शिशूंचा मृत्यूदर शून्यावर कसा येईल, यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.राज्यातील अन्य जिल्ह्याच्या आरोग्य सुविधा आणि तत्सम आकडेवारीशी तुलना न करता चंद्रपूरचे वैद्यकीय महाविद्यालय सर्व सुविधांनी परिपूर्ण आणि उपचाराच्या दृष्टीने राज्यातील अव्वल रूग्णालय झाले पाहीजे. औषधी, इमारती, तांत्रिक सुविधा, डॉक्टरांची भरती कोणत्याही बाबतीत अडचण असेल तर ती तातडीने दूर करण्यात येईल. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना पूर्ण सुविधा बहाल झालीच पाहिजे, असे आढावा घेताना त्यांनी स्पष्ट केले. बैठकीला आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा यांच्यासह आरोग्य विभागाचे आदी अधिकाºयांची उपस्थिती होती.कामचुकारांवर कारवाई कराप्रसूती विभागातील नवजात शिशूंचा अतिदक्षता विभाग (एसएनसीयू) मध्ये औषधांचा तुटवडा किंवा सुविधांचा अभाव असेल तर आताच त्याची मागणी करा. मात्र या ठिकाणी येणाºया जिल्हा व जिल्ह्याबाहेरील कोणत्याही रूग्णाला त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाभरामध्ये आरोग्य यंत्रणेच्या प्रत्येक टप्प्यावर प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर रुग्णांची काळजी घेण्याची जबाबदारी आरोग्य यंत्रणेची असून यामध्ये कसूर करणाºया सर्व अधिकारी, कर्मचाºयांवर थेट कारवाई केली गेली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.शासकीय भत्ते लाटणाºया डॉक्टरांवर कारवाईचे आदेशसरकारी सेवेमध्ये पूर्णवेळ असणारे डॉक्टर सेवेचा भत्ता घेऊनही खाजगी दवाखान्यात प्रॅक्टिस करीत असतील तर त्यांनाही शोधून तात्काळ कारवाई करण्यात यावी. या दवाखान्यातील प्रत्येक डॉक्टरांच्या संदर्भात अधिष्ठातांनी व्यक्तिगत नोंद ठेवावी. अतिदक्षता विभागातील रुग्णांची हेळसांड होणार नाही, यासाठी नियमित पाहणी करावी, असे निर्देशही त्यांनी अधिष्ठातांना दिले. पुढील १५ दिवसानंतर याबाबत पुन्हा आढावा घेतला जाईल, असेही सांगितले.वरिष्ठ आरोग्य अधिकाºयांशी चर्चायावेळी बैठकीतूनच त्यांनी मुंबईतील आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधून औषधांचा तुटवडा, अत्याधुनिक सुविधा आणि कर्मचाºयांच्या नियुक्तीबाबत चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाला व सामान्य रुग्णालयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी या परिसरातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.