शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

उकीरड्यावरच्या जीवनात उजळला प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 00:24 IST

समाजात आजही अनेक कुटुंब हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. त्या कुटुंबातील चिमुकले उकीरड्यावरील कचरा उचलून पोटाची खळगी भरतात.

ठळक मुद्देप्रेरणादायी उपक्रम : दिवाळीत दिला सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय

अनेकश्वर मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : समाजात आजही अनेक कुटुंब हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. त्या कुटुंबातील चिमुकले उकीरड्यावरील कचरा उचलून पोटाची खळगी भरतात. हा समाज आजही दुर्लक्षित, उपेक्षित आहे. अशाच बालकांच्या जीवनात आनंद देत त्यांचे उकीरड्यावरचे जीवन प्रकाशमय करण्याचे कार्य येथील श्री लक्ष्मी नृसिंह पतसंस्था व संत गाडगेबाबा वाचनालयाने केले आहे. त्यांनी ऐन दिवाळीत सामाजिक बांधिलकीचा परिचय देत राबविलेला हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.दिवाळीत सर्वत्र हर्षोल्लासाचे वातावरण असते. नानाविध पदार्थांचा गोडवा प्रत्येकाच्या घरी असतो; मात्र परिस्थितीने हतबल झालेल्या व दारिद्रयात जीवन कंठत असलेल्या कुटुंबातील बालगोपाल या आनंदापासून दूर असतात. त्यांची सकाळ हातात पिशवी घेऊन सुरू होते. उकीरड्याचा शोध घेत प्लॉस्टिक व इतर वस्तू गोळा करण्याचा त्यांचा दिनक्रम नित्याचाच.शहराच्या गल्लोगल्लीतून भटकंती करून कचºयातील प्लॉस्टिक व इतर वस्तू गोळा करायच्या आणि त्या विकून पोटाची खडगी भरायची. शिक्षणाच्या प्रवाहापासूनही ही बालके दूर असतात.या चिमुकल्यांचा जीवनात एका दिवसापुरता का होईना, आनंद देण्याचा प्रयत्न येथील श्रीनिवास सुंचूवार यांनी केले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उकीरड्यावर कचरा वेचणाºया चिमुकल्यांना त्यांनी एकत्र आणले.सामाजिक बांधिलकीतून या चिमुकल्यांना गोड घास भरविला. सर्व बालकांना नवे कपडे दिले. त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी येथील उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या हस्ते त्यांना विविध उपयोगी साहित्य देण्यात आले.श्री लक्ष्मी नृसिंह नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार, डॉ. श्याम हिवरकर, रामजन्म चक्रवती, धीरज सुंचूवार, प्रकाश पवार, कुलदीप सुंचूवार, देवानंद रामटेके, रमेश चौधरी यांनी राबविलेला हा उपक्रम समाजात प्रेरणादायी ठरला आहे.