शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा पोडसा पुलाचा स्लॅब दबला

By admin | Updated: July 14, 2016 00:55 IST

महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा बहुचर्चित पोडसा पुलाच्या स्लॅब खाली दबला आहे.

जडवाहतुकीला बंदी : दोन्ही सीमेवर फलक लावणार गोंडपिपरी : महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा बहुचर्चित पोडसा पुलाच्या स्लॅब खाली दबला आहे. या पुलावरून होणारी जड वाहतूक बघता संभाव्य धोका टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीला तात्पुरती बंदी घातली आहे. बंदीसंदर्भात महाराष्ट्र-तेलंगणातील पोलीस विभागाला सुचना देणार असून पुलाच्या दोन्ही सीमेवर बंदीचे फलक लावणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. सन २०१० च्या महापुरात बहुचर्चित पोडसा पुलाचा एक स्लॅब खाली दबला होता. बांधकाम विभागाने पाहणी करून कंत्राटदाराला दुरुस्ती करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र कंत्राटदाराने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. गोंडपिपरी तालुक्यात मागील आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू होता. त्यात वर्धा नदीवर असलेल्या धरणातील पाणी सोडल्याने नदी काठावरील गावांना पुराचा मोठा फटका बसला. नदी काठावरील शेकडो हेक्टर शेतजमिन पाण्याखाली आहे. एकीकडे बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसला असताना करोडो रुपये खर्च करून महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा पोडसा पुलही पुराच्या तडाख्याने क्षतिग्रस्त झाला आहे. सन २०१० पेक्षा पुलाचा स्लॅब मोठ्या फरकाने दबला आहे. पुलावरून दोन राज्यातील प्रवासी वाहतूक, जड वाहतुकीतून दळणवळण सुरू असते. दबलेल्या स्लॅबमुळे संभाव्य धोका लक्षात घेता, सार्वजनिक बांधकाम विभाग गोंडपिपरीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी करून जडवाहतुकीला आळा घालण्याच्या सुचना दिल्या आहेत. याबाबत दोन्ही राज्यातील पोलीस ठाण्याला पत्र देवून पुलाच्या दोन्ही सीमेवर बंदीचा फलक लावणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (शहर प्रतिनिधी) पुलात जनावरांचे मृतदेह अडकले वर्धा नदी फुगुन वाहत आहे. नदीच्या प्रवाहात सापडून मृत पावलेल्या अनेक जनावरांचे शव पोडसा पुलात अडकलेले आहेत. गाय, बैल, म्हैस यासह बकरी, रानडुक्कर यांचे कुजलेले शव पोडसा पुलात पाहायला मिळतात. कुजलेल्या शवांची दुर्गंधी सर्वदूर पसरत आहे.