शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पिकांचे संरक्षण करते घंटा!, चंद्रपुरातील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 06:17 IST

वन्यजिवांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी येथील एका तरुण शेतक-याने अफलातून शक्कल लढविली आहे

चंद्रपूर : वन्यजिवांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी येथील एका तरुण शेतक-याने अफलातून शक्कल लढविली आहे. स्वयंचलित घंटा तयार करून त्याने शेतात लावली असून या उपकरणाचे त्याने ‘शेतरक्षक’ असे नामकरणही केले आहे. हे यंत्र पूर्णत: वॉटरप्रूफ असल्यामुळे विद्युत शॉकचा धोका नाही, हे विशेष.सुहास पिंगे असे या तरुणाचे नाव असून त्याने आयटीआयमध्ये इलेट्रॉनिक्स ट्रेडचे शिक्षण घेतलेले आहे. वरोरा तालुक्यातील गौळ येथे त्यांची १२ एकर शेती आहे. शेतीचा ४० टक्के भाग हा जंगलाला लागून आहे. रानडुक्कर, चितळ, नीलगाय व ससे आदी वन्यजीवांमुळे पिकांची प्रचंड नासाडी होत होती. पिकांच्या संरक्षणासाठी रात्री माणसे ठेवावी लागत होती. तरीही वन्यजीव जुमानत नव्हते. अखेर पिकांच्या संरक्षणासाठी सोलर पॉवर कुंपण मशीनही लावून बघितली. तरीही काहीएक उपयोग झाला नाही. शेवटी पिंगे यांनी स्वत:च शक्कल चालविली आणि विजेवर चालणारी स्वयंचलित घंटा तयार केली.हे उपकरण तयार करणयासाठी त्यांना केवळ साडेपाच हजार रुपयांचा खर्च आला. १२ वॅटची बॅटरी, आॅटोस्टार्ट, स्पीकर, सर्च लाईट व ताट असे साहित्य उपयोगात आणले आहेत. दिवसभर शेतात काम केल्यानंतर घरी जाताना ही घंटा सुरू करून ठेवायची. दर पाच मिनिटांनी ३० सेकंद मंदिरातील घंटा वाजतअसल्यागत ती वाजत राहते. हे चक्र तिला विद्युत करंट मिळेपर्यंत कायम राहते. सकाळी शेतात गेल्यानंतर ती घंटा परत बंद करून ठेवतात.ही स्वयंचलित घंटा लावल्यापासून वन्यजीवांचा त्रास कायमचा बंद झाला असल्याचे सुहास पिंगे यांनी सांगितले.