चिंतन बैठकीत आरोप : प्रशासनाचे भाजपशी लागेबांधे चंद्रपूर: आगामी महानगरपालिका निवडणुकीत सक्षमपणे उतरण्यासाठी चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेसने चिंतन बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसचा प्रभाव असलेल्या प्रभागाची मोडतोड मनपा प्रशासनाने भाजपचे मंत्री व पदाधिकाऱ्यांशी संगनमत केल्याचा आरोप केला. आरक्षण जाहीर होण्याच्या १५ दिवसांपूर्वी भाजपच्या एका नगरसेवकाला त्याबाबत माहिती कशी मिळावी, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीची शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत आरक्षण सोडत, प्रभाग रचना संबंधित चर्चा व प्रभाग निहाय चर्चा करण्यात आली. सभेचे अध्यक्ष शहर अध्यक्ष नंदू नागरकर होते. माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, माजी प्रदेशसचिव सुनिता लोढिया, अॅड. विजय मोगरे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष सुलेमान अली, केशव रामटेके, संजय रत्नपारखी, वंदना भागवत, अनिल सूरपाम यांच्या नेतृत्वात सभा घेण्यात आली. याप्रसंगी होणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात महानगरपालिकाने प्रभाग रचना, आरक्षण त्याच प्रमाणे काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस व नोटबंदीबाबत विरोधकांना नजर कैदेत ठेवणे ही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना आहे. या सर्व जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयुआय, सेवादल, सर्व विभाग अध्यक्ष व पक्षाच्या नगरसेवकांना सूचना करण्यात आली की, आपण कोणत्याही वेगळ्या सभा घेऊ नये. तसेच कोणाबद्दल वाईट बोलू नये. तसेच पक्ष एकजूट राहण्याकरिता ठोस भूमिका घेण्यात येईल. आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय बैठक लावून योग्य ती जाच पडताळणी निवडण्याचे काम १ ते १५ जानेवारी २०१७ पर्यंत ठरवण्यात आला आहे. त्याची दक्षता सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घ्यावी. प्रांताध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या सूचनेनुसार जिल्ह्याचे निरीक्षक व ज्येष्ठ नेत्यांशी समन्वय साधून पक्षविरोधी कारवाई करणाऱ्याला निदर्शनास आणून दिल्यास कारवाई करण्यात येईल, असेही ठरविण्यात आले. (प्रतिनिधी) आधीच प्रभाग रचना उघड करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करा ४काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते म्हणाले की प्रभाग रचना ही नियमाला डावलून करण्यात आली आहे. त्यासाठी भाजपचे मंत्री, पदाधिकारी आणि मनपा आयुक्त संजय काकडे यांच्या संगनमताने काँग्रेस पक्षातून निलंबित झालेल्या नगरसेवकाला हाताशी धरुन काँग्रेस विचार सरणीच्या प्रभागातील प्रभाग रचनेला तोड- फोड करुन आणि प्रभाग रचना जाहीर होण्याआधीच भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाला १५ दिवसापूर्वीच माहीत कसे झाले, याचा निषेध करण्यात आला. त्या अधिकाऱ्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अटी शर्ती नियमाचे उल्लंघन केल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्याकडे किंवा न्यायालयात दाद मागण्यात येईल.
काँग्रेस समर्थक प्रभागांची मोडतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2016 01:39 IST