शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कार्यारंभ आदेश न दिलेल्या कोट्यवधींच्या कामांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 00:39 IST

चंद्रपूर महानगर पालिका व जिल्ह्यातील सहा नगर परिषद अंतर्गत नगरोत्थान योजनेसाठी कोट्यवधी रूपयांची कामे मंजूर झाली आहेत. दलित वस्ती सुधार योजना तसेच जिल्हा नियोजन समितीसह २५ कोटींपेक्षा अधिक कामांचाही समावेश आहे. परंतु, या कामांचे वर्कर ऑर्डर काढण्यात आले नव्हते.

ठळक मुद्देमंत्रालयातून आदेश धडकला : जिल्हा परिषद, मनपा व नगर परिषदांची कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यापूर्वी राज्यात भाजपचे सरकार असताना जिल्हा परिषद, महानगर पालिका व नगर परिषदांच्या क्षेत्रातील विकास कामांना मंजुरी दिली होती. परंतु, वर्क ऑर्डर (कार्यारंभ आदेश) न दिल्याने या तिनही स्थानिक स्वराज्य संस्थांचे राज्य सरकारकडे लक्ष लागले होते. दरम्यान, मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होताच वर्क ऑर्डर न दिलेल्या सर्वच कामांना तात्काळ स्थगिती मिळाली. यासंदर्भात मंगळवारी जिल्ह्यात आदेश धडकताच भाजपची सत्ता असलेल्या जि. प. आणि चंद्रपूर मनपा प्रशासनात धडकी भरली आहे.चंद्रपूर महानगर पालिका व जिल्ह्यातील सहा नगर परिषद अंतर्गत नगरोत्थान योजनेसाठी कोट्यवधी रूपयांची कामे मंजूर झाली आहेत. दलित वस्ती सुधार योजना तसेच जिल्हा नियोजन समितीसह २५ कोटींपेक्षा अधिक कामांचाही समावेश आहे. परंतु, या कामांचे वर्कर ऑर्डर काढण्यात आले नव्हते.चंद्रपूर महानगर पालिकेत भाजपची सत्ता आहे. राज्य सरकारने अनिश्चित काळासाठी या कामांना स्थगिती देण्याचा आदेश जारी केल्यामुळे नव्या सरकारकडून केली जाणारी ही आर्थिक कोंडी असल्याची चर्चा सत्ताधारी पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये दबक्या सुरात सुरू झाली. स्वराज्य संस्थांच्या सर्वच विभागातील यापूर्वीच्या विकास कामांना कात्री लागण्याची शक्यता एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. शहरातील पायाभूत सूविधा व सामाजिक कल्याणाच्या योजनांनाही स्थगितीचा फटका बसू शकते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, गडचांदूर, मूल, चिमूर नागभीड, ब्रह्मपूरी नगर परिषदेतही वर्क ऑर्डर न झालेली कोट्यवधींची कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. पाणी पुरवठा योजना, महिला, बालकल्याण, आरोग्य, स्वच्छता, नगरोत्थान, अंतर्गत रस्ते आणि मोठ्या योजनांना स्थगिती देण्यात आली. जिल्ह्यातील नगर परिषदांना १०० कोटी मंजूर झाले होते. यातील काही निधी नगर परिषदांना देण्यात आला. परंतु वर्क आॅर्डर नसलेल्या कोट्यवधी कामे यापुढे होणार नसल्याने सरकारविरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. वर्क ऑर्डर मंजूर करण्याचा नवीन आदेश येईपर्यंत विकासाची कोट्यवधी कामे रखडणार आहेत. नियोजन समितीकडून काही नगर परिषदांना निधी मंजूर झाला होता. त्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही. अशी कामे आता कायमची बंद राहणार असल्याने स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाºयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. परिणामी आदेश येईपर्यंत शहरातील नवीन विकास कामांचे प्रस्तावही आता गुंडाळून ठेवावे लागणार आहे.आमदारांनी सुचविलेली कामे फाईलबंदआमदार व जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी सुचविलेली कामे व कार्यारंभ आदेश न दिलेली कामे तुर्त फाईलबंद होणार आहेत. ज्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले, अशा कामांची यादी गुरूवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाठविण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने जारी केला. ही यादी विहित वेळेत मिळाली नाही तर सदर कामाला ‘कार्यारंभ आदेश दिला नाही’ असे समजावे असेही नमुद आहे. त्यामुळे गुरूवारी जि. प. मध्ये धावपळ दिसून आली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका