शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पाटणच्या राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज वाटपाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:25 IST

शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज वाटप करावे, कर्ज वाटपात हयगय करणाऱ्या बँकाच्या अधिकाºयांवर कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र या निर्देशाला पाटण येथील राष्ट्रीयीकृत बँक अपवाद ठरल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील पाटण येथे एकमात्र राष्ट्रीयीकृत बँक आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली ही बँक बंद असून तीन महिने लोटूनही अनेक शेतकऱ्यांची झोळी रिकामीच आहे.

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त : तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली बँक पंधरा दिवसांपासून बंद

फारूख शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज वाटप करावे, कर्ज वाटपात हयगय करणाऱ्या बँकाच्या अधिकाºयांवर कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र या निर्देशाला पाटण येथील राष्ट्रीयीकृत बँक अपवाद ठरल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील पाटण येथे एकमात्र राष्ट्रीयीकृत बँक आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली ही बँक बंद असून तीन महिने लोटूनही अनेक शेतकऱ्यांची झोळी रिकामीच आहे.जिवती तालुक्यात पाटण येथे एकमात्र राष्ट्रीयीकृत बँक असल्याने तालुक्यातील सर्वच शेतकरी या बॅकेतूनच पीक कर्ज घेतात. यासाठी तालुक्यातील अनेक शेतकºयांनी प्रस्ताव दाखल केले. परंतु, गेल्या पंधरा दिवसांपासून बँक बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे. आर्थिक तंगीमुळे पेरणीची कामे खोळंबली असून अनेकांनी अवैध सावकारांची दारे ठोठावली आहेत. अवैध सावकारांनीही २५ टक्के इतक्या व्याज दराने शेतकºयांना पैसे वाटणे सुरू केल्याची माहिती आहे.शेतकºयांनी बँकेत सातबारा जमा केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी त्यांना ‘नो डू’ प्रमाणपत्र देण्यात आले. एकूण १७ बँकेचे ‘नो डू’ प्रमाणपत्र सादर केल्यानंतर आपल्याला कर्ज मिळेल व पेरणी करू शकणार, अशा आशेवर असणाºया शेतकऱ्यांना गेल्या पंधरा दिवसांपासून बँक बंद असल्याने चकरा मारावे लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.पैसे काढण्यात अडचणीतांत्रिक बिघाडामुळे पाटण येथील बँक गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. दरम्यान ज्यांचे पीक कर्ज मंजुर झाले व खात्यात रकम जमा झाली, अशा शेतकऱ्यांचे एटीएम व आधार लिंक नसल्याने दुसऱ्या बँकेतूनही पैसे काढता येत नाही. यामुळे अनेक शेतकरी बँक सुरू होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.निराधार नागरिकांचे हालतालुक्यातील अनेक निराधारांचे पैसे बँक खात्यात जमा झाले आहेत. परंतु, बँक बंद असल्याने अनेक निराधार दररोज बँकेत येऊन परत जातात. ते सध्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.शेतकºयांना त्रास होवू नये यासाठी बँक लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. पीक कर्ज वाटप करण्यात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल.- संजय धोटे, आमदार, राजुरा.