शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदीवरील ‘तो’ बंधारा तोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:05 IST

वर्धा नदीवरील चिंचाळा येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे सात गावांना पाणीपुरवठा होते. मात्र अलीकडे एमआयडीसी व धारीवाल कंपनीने वर्धा नंदीवर बंधारा बांधून सात गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या नदीला कोरड आणली आहे.

ठळक मुद्देपिण्याचे पाणी उद्योगाला : सात गावांच्या पाण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे निवेदन

चंद्रपूर : वर्धा नदीवरील चिंचाळा येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे सात गावांना पाणीपुरवठा होते. मात्र अलीकडे एमआयडीसी व धारीवाल कंपनीने वर्धा नंदीवर बंधारा बांधून सात गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या नदीला कोरड आणली आहे. हा बंधारा येत्या सात दिवसात प्रशासनाने तोडावा, अन्यथा बंधारा तोडून फेकला जाईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे चंद्रपूर तालुकाध्यक्ष रजित मासीरकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना दिला आहे.वर्धा नदीवर बंधारा बांधल्यामुळे चिंचाळा, शेणगाव, सिदूर, वांढरी, वेंडली, पिपरी, धानोरा या सात गावांचा पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनोने यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तुम्हीही बंधारा बांधा, असा उलट सल्ला देत एकप्रकारे ग्रामीण जनतेचा अपनाम केला आहे. या बंधाºयामुळे सात गावातील २० हजार लोकांना पाणी पुरवठा बंद होत आहे. शासनाचे पिण्याच्या पाण्याला पहिले प्राधान्य असून नंतर शेती आणि शेवटी उद्योगाला पाणी देण्याचा नियम प्रशासनाने नियम धाब्यावर बसवून उद्योगाला पाणी देण्याची मंजुरी कशी दिली, असा सवाल संभाजी ब्रिगेडने केला आहे.प्रशासनाने सात दिवसात बंधारा तोडावा अन्यथा संभाजी ब्रिगेड सातही गावाच्या लोकांना सोबत घेऊन बंधारा तोडून टाकेल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन जिल्हाधिकारी, आ. नाना श्यामकुळे, तहसीलदार व कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांना देण्यात आले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक चंद्रकांत वैद्य, तालुकाध्यक्ष रजिंत मासीरकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेश कांबळे, शेणगावचे अध्यक्ष मंगेश चटकी, कार्याध्यक्ष ओमेश्वर मेसेकर, सरपंच पारस पिंपळकर, सरपंच डॉ. शरद रणदिवे, गुरुदेव सेवा मंडळचे पदाधिकारी पवार यांच्यासह आदींची उपस्थिती होती. प्रशासनाने दखल घेण्याची मागणी आहे.