शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

सावली येथे धाडसी दरोडा

By admin | Updated: March 3, 2016 01:03 IST

२ मार्चच्या रात्री एक वाजताच्या दरम्यान दरोडेखोरांनी सावली येथील ओम ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दुकान फोडून सुमारे एक लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याने ...

ज्वेलर्स फोडले : १२ तासात आरोपी ताब्यातसावली : २ मार्चच्या रात्री एक वाजताच्या दरम्यान दरोडेखोरांनी सावली येथील ओम ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दुकान फोडून सुमारे एक लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे. सावली पोलिसांनी अवघ्या बारा तासात तीन चोरट्यांना जेरबंद केल्याने पोलीस प्रशासनाच्या कर्तबगारीवर समाधान व्यक्त केले जात आहे.२ मार्चच्या रात्री १ वाजताच्या सुमारास गजबजलेल्या परिसरात असलेल्या व्यंकटेश मंदिराजवळील अनिल विनायक कनपत्तीवार यांच्या मालकीच्या ओम ज्वेलर्सचे कुलूप फोडून असल्याची बाब सकाळी ५ वाजताच्या दरम्यान शेजाऱ्यांच्या लक्षात आली. त्यावरुन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. दुकानात पाहिले असता दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडून होते. त्यात २५ हजार रुपयांच्या सोन्याच्या बेसर, २५ हजार रुपयांचे सोन्याचे डोरले, तीन किलो चांदीच्या पायपट्ट्या, कडे आणि चाळ व रोख २५ हजार रुपये असा एकूण एक लाख ७५ हजार रुपयाच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. रात्री १ वाजतादरम्यान सावली येथील इसम शौचास गेला असता त्यांना लेंढार बोडी परिसरात असलेल्या विहिरीकडे तीन इसम काहीतरी करीत असताना आढळले आणि सकाळीच सदर घटना उघडकीस आली. त्यात आरोपीमधील जगदीश कान्हुजी लेनगुरे (३५) हा सावली येथीलच असून सध्या मूल तालुक्यातील फिस्कुटी येथे राहायला गेला होता. त्याला ओळखत असल्यामुळे त्याचा शोध घेऊन उर्वरित दोन आरोपी बबलू तेजराम जाधव (३५) व प्रितम जाठ (३८) दोन्ही रा. गाल्हेर (मध्य प्रदेश) या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला असून याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनात सावलीचे ठाणेदार व्ही.डी. निरुप, सहायक पोलीस निरीक्षक पी.पी. साखरे, सहायक फौजदार परशुराम यादव, शिपाई सुनील बद्दलवार यांनी परिश्रम घेतले. (तालुुका प्रतिनिधी)