ब्रम्हपुरी : येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा, ब्रम्हपुरीतर्फे पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ब्रम्हपुरीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे तथा ब्रम्हपुरी न. प.च्या नगराध्यक्ष रिता उराडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी उभयतांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला व मराठीतले पाहिले पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा उल्लेख केला.
या कार्यक्रमाला म. रा. म. पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. धनराज खानोरकर, ब्रम्हपुरी शाखा अध्यक्ष डॉ. प्रा. रवी रणदिवे, संघटक गुरुदेव अलोने, उपाध्यक्ष राहुल मैद, कार्याध्यक्ष प्रा. संजय लांबे, सचिव नंदू गुड्डेवार, दत्तात्रय दलाल, सदस्य अमरदीप लोखंडे, प्रशांत राऊत, प्रा. प्रकाश वट्टी, सुरेश बनपूरकर, निशांत अंबादे आदी उपस्थित होते.