शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

१८ दिवसांच्या मुलीवर मेंदूची शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:33 IST

एका पाच दिवसांच्या बालिकेला जन्मापासूनच मेंदूचा दुर्मिळ आजार झाला. मेंदूचा वरचा भाग मणक्यातून शरिराच्या बाहेर आला होता. अशा जर्जर अवस्थेत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती झालेल्या या चिमुकलीवर तेथील डॉक्टरांनी ती १८ दिवसांची झाल्यानंतर यशस्वी शस्त्रक्रिया करीत तिला जीवदान दिले.

ठळक मुद्देशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने वाचविले प्राण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एका पाच दिवसांच्या बालिकेला जन्मापासूनच मेंदूचा दुर्मिळ आजार झाला. मेंदूचा वरचा भाग मणक्यातून शरिराच्या बाहेर आला होता. अशा जर्जर अवस्थेत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती झालेल्या या चिमुकलीवर तेथील डॉक्टरांनी ती १८ दिवसांची झाल्यानंतर यशस्वी शस्त्रक्रिया करीत तिला जीवदान दिले.पूर्वी दुर्मिळ आजार असणाऱ्या रूग्णांना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात येत होते. आता अशा रूग्णांची शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे करणे शक्य झाले आहे. त्याचीच प्रचिती उपरोक्त उदाहरणावरून झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथील सोनाली व खुशाल कांबळे यांची पाच दिवसांची चिमुकली २५ डिसेंबर २०१८ ला या रूग्णालयात भरती झाली. ती जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथील भरती असतानाच तिला हा आजार जडल्याचे लक्षात आले होते. या आजारात मेंदूचा वरचा भाग मणक्यातून शरिराच्या बाहेर येतो व सोबतच डोक्याचा आकार तीन ते चार पट वाढून जातो. बाळाचे डोके नीटपणे सांभाळता येत नाही. बाळाला साधारण आयुष्य जगता येत नाही व अशा परिस्थितीत बाळ मतिमंद होण्याचा जास्त धोका असतो. सदर शस्त्रक्रियेसाठी बालरोग विभागाचे समाजसेवा अधिक्षक तानाजी शिंदे यांनी समुपदेशन केले.सदर मुलीला चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. येथील प्रसिद्ध ब्रेन स्पाईन शल्य चिकित्सक डॉ. शार्दुल वरगंटीवार, भुलतज्ज्ञ डॉ. किरण जान्हवे व चमू यांच्या प्रयत्नाने सदर चिमुकलीवर जन्माच्या अठराव्या दिवशी म्हणजे ०८ जानेवारी २०१९ रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हा बाळाचे वजन १९०० ग्रॅम होते. शस्त्रक्रियेनंतर सुटीच्या दिवशी बाळाचे वजन २४०० ग्रॅम झाले. बालरोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एम. जे. खान व इतर डॉक्टरांच्या सल्ल्याने नवजात शिशु कक्षात भरती करण्यात आले. त्यानंतर दुसरी शस्त्रक्रिया २५ जानेवारी २०१९ रोजी करण्यात आले. यात मेंदूत नळी टाकून मेंदूतील पाणी बाहेर काढून डोक्याचा आकार कमी करण्यात आला. या संपुर्ण प्रक्रियेत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांचे मार्गर्दान लाभले.