शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हांडल्याचा ‘जय’चा ब्रह्मपुरीत तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 00:41 IST

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याची शान ठरलेला ‘जय’ हा वाघ मागील तीन महिन्यांपासून अभयारण्यातून गायब आहे.

पत्रके वाटली : पत्ता सांगणाऱ्यास मिळणार बक्षीसनागभीड : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याची शान ठरलेला ‘जय’ हा वाघ मागील तीन महिन्यांपासून अभयारण्यातून गायब आहे. त्याचा शोध नागभीड व चिमूर तालुक्यातील जंगलात एका वन्यजीव संस्थेकडून अतिशय गुप्तपणे घेतल्या जात आहे. मात्र अद्यापही ‘जय’चा कोणताही मागमुस लागलेला नाही, अशी विश्वसनीय माहिती आहे.जय २०१३ मध्ये उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात आला होता. तेव्हापासून तो तेथेच राहत असला तरी कधी कधी तो या अभयारण्याच्या बाहेर आसपासच्या जंगलात जायचा. गेल्या तीन वर्षात जय ने स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली होती. त्याला पाहण्यासाठी अगदी दूरवरून पर्यटक या अभयारण्यात खास येत होते. त्याच्या ओळखीसाठी त्याला दोनदा रेडियो कॉलर लावण्यात आली. १८ मार्च २०१६ रोजी त्याला शेवटची रेडियो कॉलर लावण्यात आली. पण ती सुद्धा बंद पडली आणि तो तेव्हापासूनच गायब असल्याची माहिती आहे. जयच्या गायब होण्याने वनविभागात चांगलीच खळबळ माजली आणि वन विभागाकडून जयचा शोध सुरू झाला. तो तपास अद्यापही सुरूच आहे. जयच्या तपासासाठी वन्यजीव संस्थांचीही मदत घेण्यात आली आहे. या संस्थांपैकी एक असलेली ‘वाईल्ड लाईफ कंझरवेशन अ‍ॅड डेव्हलपमेंट सेंचुरीज’ ही संस्था नागभीड, ब्रह्मपुरी आणि चिमूर तालुक्यातील जंगलात या वाघाचा शोध घेत आहे. या संस्थेच्या एका पदाधिकाऱ्याने येथील काही वन्यजीव अभ्यासकांना सोबत घेवून भंडारा जिल्ह्यातील चांदी-चन्नेवाडा, नागभीड तालुक्यातील गायमुख जंगल परिसर, सातबहीणी डोंगर परिसर हा भाग पिंजून काढला. पण या तपासात जयचा कोणताही मागमुस आढळून आला नाही. (तालुका प्रतिनिधी)