शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे ब्रह्मपुरीकर चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 05:00 IST

शहरात व तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरात आजघडीला १५५ तर ग्रामीण भागात १४१ असे एकूण २९६ रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत. तर तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. ही वाढती कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देतालुका लॉकडाऊन करा, तालुक्यात आतापर्यंत तिघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : शहरात तसेच तालुक्यात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.शहरातील कोणताही भाग आजघडीला सुरक्षित नाही. त्यामुळे ब्रम्हपुरी शहरात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी करण्यात येत आहे. शहरात व तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरात आजघडीला १५५ तर ग्रामीण भागात १४१ असे एकूण २९६ रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत. तर तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. ही वाढती कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागभीड येथील तहसीलदार यांनी यासंदर्भात लवकरच पाऊल उचलावे, अशीही मागणी आहे.लक्षणे दिसून येताच त्वरित तपासणी कराकोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता ब्रम्हपुरी तालुक्यातील नागरिकांनी कोरोना संदर्भात अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तपासणीला अधिक उशीर केल्यास धोकाही अधिक संभवतो. उशिरा तपासणीमुळे कोरोना विषाणूचा संचार फुफ्फुसात होऊन त्याचा फुफ्फुसावर विपरित परिणाम होतो. संसर्गाची लक्षणे आढळताच तत्काळ तपासणी करा व संभाव्य धोक्यापासून स्वत:ला दूर ठेवा, असे कळकळीचे आवाहन उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी केले आहे.अ‍ॅन्टिजेन तपासणीला घाबरू नकालक्षणे आढळताच तपासणी करावी. मात्र बऱ्याच व्यक्ती शेवटच्या टप्प्यात तपासणीसाठी पुढे येतात. त्यामुळे धोका वाढतो. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून ताप, खोकला, घसा खवखवणे व तोंडाची चव जाणे, अशी लक्षणे आढळताच तत्काळ अ‍ॅन्टिजेन चाचणी करून घ्या. घाबरू नका. ताप अंगावर काढू नका, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्नब्रह्मपुरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मात्र प्रशासनाला नागरिक अजिबात सहकार्य करीत नाहीत. तरीसुद्धा प्रशासन आपले काम जबाबदारीने करीत आहे. नागरिकांनीही स्वत: सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा नियमित वापर करावा. आजारी व्यक्तीने आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. चाचणी करून पहिल्या टप्प्यातच कोरोनाचा नायनाट करा, असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या