शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी-वडसा राज्यमार्गाचे वर्षभरापासून भिजत घोंगडे

By admin | Updated: May 7, 2017 00:32 IST

वडसा व ब्रह्मपुरी ही दोन्ही ठिकाणे महत्त्वपूर्ण आहेत. दररोज या एकमेव राज्य मार्गावरुन अनेक वाहने व हजारो नागरिक वाहतूक करीत असतात.

३०० मीटरचा रस्ता धूळ खात : अनेक प्रवाशांचा जीव मुठीतलोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : वडसा व ब्रह्मपुरी ही दोन्ही ठिकाणे महत्त्वपूर्ण आहेत. दररोज या एकमेव राज्य मार्गावरुन अनेक वाहने व हजारो नागरिक वाहतूक करीत असतात. परंतु सुरबोडी गावाजवळ ३०० मीटरचा रस्ता गेल्या वर्षभरापासून रखडलेला असल्याने अनेकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.वडसा - ब्रह्मपुरी या मार्गादरम्यान सुरबोडी गाव आहे. या गावाजवळ गोसीखुर्द कालव्याच्या पुलापासून वडसाकडे ३०० मीटर रस्त्याचे काम वर्षभरापासून रखडलेले आहे. या राज्यमार्गावरुन भिलाई, रायपूर, चंद्रपूर, हैद्राबाद, नागपूर या दिशेने जड वाहनांची रात्रदिवस वाहतूक सुरू असते. तसेच ब्रह्मपुरी व वडसा या शहरांकडे कार्यालयीन कामाकरिता आणि बाजारपेठ, विद्यार्थी, शिक्षक, पालक व आरोग्याच्या दृष्टीने ब्रह्मपुरीत अनेक रुग्ण येत असतात. अशा सर्वांना जीव मुठीत घऊन प्रवास करावा लागत आहे. परिणामी अजूनही संबंधित कंत्राटदाराला जाग का येत नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्याला विचारणा केली असता त्यांनी कंत्राटदारावर प्रश्न चिन्ह निर्माण केले. कंत्राटदार ऐकत नाही. उलट याबाबत हात वर केल्याचे बोलत असल्याने विभागासमोरही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून हा रस्ता पूर्णत्वास न्यावा, अशी मागणी अनेकांनी केली आहे. या रोडवरुन जाताना धुळीने पूर्ण रस्ता दिसेनासा होत असतो. त्यामुळे अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. तसेच महिला व बालकांच्या डोळ्यात व श्वसनक्रियेत धूळ जात असल्याने आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वडसा - ब्रह्मपुरी राज्यमार्गात रखडलेले ३०० मीटरचे काम पूर्ण करावे, अशी हजारो नागरिकांची मागणी आहे.