शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी, सावलीला वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:52 IST

शनिवारी सायंकाळी सावली येथे तर रविवारी सायंकाळी ब्रह्मपुरी शहराला जोरदार वादळाचा तडाखा बसला. वादळाने सावली येथील अनेकांच्या घरांचे छप्परे उडाले.

ठळक मुद्देजनजीवन विस्कळीत : ब्रह्मपुरी-वडसा मार्ग एक तास बंद

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी/सावली : शनिवारी सायंकाळी सावली येथे तर रविवारी सायंकाळी ब्रह्मपुरी शहराला जोरदार वादळाचा तडाखा बसला. वादळाने सावली येथील अनेकांच्या घरांचे छप्परे उडाले. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले. तर ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील वाहतूक एका तास वादळी पावसाने पुर्णत: बंद पडली आणि जनजीवन विस्कळीत झाले.ब्रह्मपुरी येथे रविवारी दुपारी पाच वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे वडसा- ब्रह्मपुरी मार्गावर तब्बल तीन मोठी झाडे उन्मळून पडली. परिणामी एक तास वाहतूक बंद पडली होती. वाहनाच्या रांगा लागल्याने वाहतूक सुरळीत होईल किंवा नाही, याबद्दल वाहनधारक चिंतेत होते. परंतु, ब्रह्मपुरीचे पोलीस निरीक्षक विलास चव्हाण यांनी लगेच वाहतूक निरीक्षक दोडके, मंढरे व गावकºयांच्या मदतीने झाडे तोडून रस्ता मोकळा केला. त्यामुळे वाहतूक सुरु झाली. जोरदार वादळाने शहरातील वीज ताराही तुटल्या होत्या. त्यामुळे काही काळासाठी वीज पुरवठा खंडीत झाला होता.तर सावली येथे शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सावली येथे आलेल्या चक्री वादळाने लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यात राजेश रार्इंचवार यांच्या मालकीच्या शिवशक्ती राईस मीलची भींत कोसळून टीनाचे पत्रे उडाले.राईस मीलची भींत मशिनरीवर कोसळून त्यात अंदाजे दहा ते बारा लाखांचे नुकसान झाले. मीलमध्ये असणारे तांदूळ सुद्धा पावसाने भीजल्याने ते खराब झाले आहे. तर अनेकांच्या घरांचे छप्परे उडाले असून कित्येक ठिकाणी मोठमोठी झाडे कोलमडून पडली. त्यामुळे तालुक्यातील गावांमध्ये रात्रभर वीज पुरवठा खंडीत होता.