शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

घोरपडीची शिकार दोघांना अटक

By admin | Updated: July 18, 2016 01:39 IST

मध्य चांदा वनविकास महामंडळाचे झरण वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. ७९ मध्ये घोरपडीची शिकार करताना दोघांना पकडण्यात आले.

वनविकास महामंडळातील प्रकार : मालवाहू वाहनही केले जप्त कोठारी : मध्य चांदा वनविकास महामंडळाचे झरण वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. ७९ मध्ये घोरपडीची शिकार करताना दोघांना पकडण्यात आले. अटकेत असलेले आरोपी सचिन गेडाम (२१) रा. राळापेठ त. गोंडपिपरी जि. चंद्रपूर व प्रसनेजित मल्लिक (४३) रा. आष्टी ता. चामोर्शी जि. गडचिरोली अशी नावे आहेत. सचिन गेडाम व प्रसेनजित मल्लिक हे दोघेही मालवाहू वाहनाने बल्लारपूर येथून आष्टीकडे वाहन क्र. एमएच ३३- जी २२०५ ने जात होते. ते रस्त्याने जात असताना झरण जवळील रोडलगत बन विभागाच्या कक्ष क्र. ७९ मध्ये त्यांना घोरपड दिसली. तेथे त्यांनी वाहन थांबवून घोरपडीचा पाठलाग केला. घोरपड आवाक्यात आल्याचे दिसताच त्यांनी लोखंडी रॉडने घोरपडीची शिकार केली. त्यादरम्यान, वनरक्षक ए.एन. गुगलोत व एस.एच. पवार या परिसरात गस्त करीत होते. त्यांना दोन अज्ञात व्यक्ती घोरपडीला मारत असल्याचे दिसले. वनरक्षकांनी आरोपींना घोरपड, लोखंडी रॉड व माल वाहतूक करणाऱ्या वाहनासह पकडले. सदर प्रकार विभागीय व्यवस्थापक एम.एस. फारूखी, सहा. व्यवस्थापक प्रफुल्ल वाघ, वनाधिकारी निकोडे यांना कळविले. आरोपींवर वन्यजीव अधिनियमाअंतर्गत गुन्ह्याची नोंद करून अटक केली. पूढील तपास वनाधिकारी बी.पी. परदेशी करीत असून आज १८ जुलै रोजी गोंडपिपरी न्यायालयात हजर करणार असल्याचे समजते. या प्रकारामुळे वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांत दहशत पसरली आहे. (वार्ताहर)