शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

उपअधीक्षकासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2017 00:29 IST

शहराजवळच्या वडसा रोड लगत असलेल्या शेतजमिनीच्या रेकॉर्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ....

१५ हजारांची लाच : भूमी अभिलेख विभागात रेकॉर्ड दुरूस्ती प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : शहराजवळच्या वडसा रोड लगत असलेल्या शेतजमिनीच्या रेकॉर्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ब्रह्मपुरी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकासह दोघांना शनिवारी रंगेहात अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव उपअधीक्षक सिडनी गिलबर्ट थॉमस (५४) आणि सुरेश नान्हे (३५) रा. गुजरी वार्ड, ब्रह्मपुरी असे आहे. या घटनेतील तक्रारकर्ता व्यक्ती ब्रह्मपुरी येथील रहिवासी आहे. त्यांच्या आजीच्या नावाने शहराजवळच्या वडसा रोडलगत सर्व्हे नं. ६६७ आराजी १.६२ आर शेती आहे. या शेतीचा पूर्वीचा सर्व्हे नं. ७८२ होता. त्यांच्या शेतील लगत मागील भागात ताराचंद झुरे याचे जुना सर्व्हे नं. ६६७ व नवीन सर्व्हे नं. ७८२ ची शेत आहे. त्यांच्या शेतीच्या मोजणीनंतर हा क्रमांक बदलून मिळाला. तर तक्रारकर्त्याच्या आजीच्या शेतीचा सर्व्हे नं. ६६७ झाला. त्याकरिता त्यांनी रेकॉर्ड दुरूस्तीकरतिा ब्रह्मपुरीचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांकडे अर्ज सादर केला. त्यावर कार्यवाही करीत उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्या अर्जावर चंद्रपूर येथील जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधीक्षकांकडून अभिप्राय मागितला.या प्रकरणी नागपूर विभागीय आयुक्तांकडून पुनर्विलोकन परवानगी प्राप्त करून नागपूर विभागाचे अपर आयुक्तांकडे दाद मागितली. त्यावेळी अपर आयुक्तांनी ब्रह्मपुरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना सविस्तर चौकशी करण्याचे सांगून नव्याने आदेश पारित करण्याची सूचना केली. त्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांनी ब्रह्मपुरी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकांना नव्याने चौकशी करून त्या शेतजमिनीच्या रेकॉर्डमध्ये दुरूस्ती करण्यास सांगितले. तसेच त्यांनी दुरूस्ती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. हे पत्र तक्रारदाराने उपअधीक्षक सिडनी गिलबर्ट थॉमस यांना ५ एप्रिल रोजी सादर केले. त्यानंतर तक्रारकर्त्याने भूमी अभिलेख उपअधीक्षक थॉमस याला दोन-तीन वेळा भेटून दुरुस्ती अहवालाविषयी विचारणा केली. त्यानंतर पुन्हा तक्रारदाराने १८ मे रोजी उपअधीक्षक थॉमस याची भेट घेतली. तेव्हा थॉमस याने शेतजमिनीचा रेकॉर्ड दुरुस्त करून त्याचा अहवाल उपविभागीय अधिकाऱ्याकडे पाठविण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारकर्त्याने लाचेची रक्कम कमी करण्याची मागणी केली. परंतु उपअधीक्षक थॉमस २५ हजार रुपयांवर अडून होता. त्यामुळे तक्रारदाराने पैसे देण्यास होकार दिला. परंतु तक्रारकर्त्याला लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्याअनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी सापळा रचला. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक व्ही. पी. आचेवार, मनोहर एकोणकर, महेश मांढरे, संतोष यलपूलवार, अजय बागेसर, समीक्षा भोंगळे, दिनेश देवाडे आदींनी केली.खासगी व्यक्तीच्या माध्यमातून लाचउपअधीक्षक थॉमस याची भेट घेऊन तक्रारकर्त्याने लाचेच्या रकमेत वाटाघाटी करण्याची मागणी केली. त्यानंतर थॉमसने १५ हजार रुपये स्वीकारून तक्रारकर्त्यांच्या आजीच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या रेकॉडमध्ये दुरुस्ती करून तो अहवाल ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकाऱ्याकडे पाठविण्यास होकार दिला. ही लाचेची रक्कम थॉमस याने सुरेश नान्हे याच्या माध्यमातून स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.