शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बोगस सातबाऱ्याने कोलामांची फसवणूक

By admin | Updated: August 26, 2015 00:53 IST

बोगस सातबारा जोडून कोलामाची प्रत्येकी ८८ हजार रूपयाची तर सोसायटी गटसचिवांच्या संगनमताने तीन कोटींचे बोगस पीक कर्ज वाटप दाखवून ...

आबीद अली यांचा आरोप : तीन करोडचे बोगस कर्ज वाटपराजुरा : बोगस सातबारा जोडून कोलामाची प्रत्येकी ८८ हजार रूपयाची तर सोसायटी गटसचिवांच्या संगनमताने तीन कोटींचे बोगस पीक कर्ज वाटप दाखवून दलालानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची फसवणूक केल्याचा आरोप आबीद अली यांनी पत्रकार परिषदेत केला.विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत कमलापूर येथील आदिवासी कोलाम भीमा सुपारी कोडापे यांनी माहिती देताना सांगितले, वनसडी येथील आदिवासी सोसायटीने माझ्या नावाचे खोटे कागदपत्र तयार करुन फसवणूक केली आहे. २४ आॅगस्टला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गडचांदूर शाखेत पीक कर्जाबद्दल माहिती विचारण्यासाठी आपण गेलो असता, २९ जुलै २०१५ ला ८८ हजार ५८ रुपये माझ्या खात्यातून काढल्याची नोंद आहे. परंतु, आपण पीक कर्जाचे एक रुपयासुद्धा उचललेला नाही, असे त्यांनी सांगितले. गरीब लाचार कोलामाची थट्टा करणाऱ्या आणि गरीबाचे पैसे हडप करणाऱ्यांवर कारवाई होणार काय. कोरपना, जिवती तालुक्यात पिपर्डा, थिप्पा, दुर्गाडी, कोठोडा, जेवरा, अकोला, येरगव्हाण, कमलापूर, पारडी, वनसडी, मांडवा, कोदेपूर, मारईपाटण या सोसायट्याची चौकशी करण्याची मागणी आबीद अली यांनी यावेळी केली. काही दिवसांपूर्वी वनसडी आदिवासी सोसायटीच्या विरोधात ४५ लाखांच्या अफरातफरीची तक्रार पोलिसात झाली होती. ती चौकशी सुरू आहे, या सोसायटीचे गटसचिव हे अज्ञानाचा फायदा घेऊन आदिवासी, कोलामांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करीत आहे. जमीन नावाने नसताना बोगस सातबारा तयार करुन पीक कर्जाची उचल केली आहे. बँकेचे सोसायट्यावर नियंत्रण नसल्यामुळे पीक कर्ज वाटपात घोळ झाल्याचे आबीद अली यांनी म्हटले आहे. याची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व आदिवासी कोलामांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)भ्रष्टाचार करणाऱ्याना सोडणार नाहीआपण शेतकऱ्यांच्या बाजूने असून खोटे काम करणाऱ्यांना कारागृहात टाकल्याशिवाय सोडणार नाही. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल. - मनोहर पाऊणकर अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक