शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बोडी खोलीकरणाच्या कामात दाखविले बोगस मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:48 IST

तालुक्यातील बोर्डा झुल्लूरवार येथे ग्राम रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने ४ लाख २० हजारांच्या निधीतून बोडी खोलीकरणाचे काम करण्यात आले.

ठळक मुद्देबोर्डा (झु.) येथील गैरव्यवहार : दोषींवर कारवाई करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतपोंभुर्णा : तालुक्यातील बोर्डा झुल्लूरवार येथे ग्राम रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने ४ लाख २० हजारांच्या निधीतून बोडी खोलीकरणाचे काम करण्यात आले. परंतु यामध्ये मजुरांची बोगस नावे दाखवून निधीचा गैरव्यवहार करण्यात आला. त्यामुळे ग्रामरोजगार सेवक, सरपंच व सचिवांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.बोर्डा झुल्लूरवार येथे २०१६-१७ मध्ये बजरंग पत्रुजी कुळमेथे व ओंडू रामटेके या दोन शेतकºयांच्या शेतामध्ये बोडी खोलीकरणाचे काम करण्यात आले. परंतु हे काम नियमानुसार झाले नाही. सदर दोन्ही बोडीच्या कामासाठी ४ लाख २० हजारांचा निधी आला. हे काम चार हप्त्यांमध्ये आटोपून टाकण्यात आले. यामध्ये ३५ पेक्षा अधिक बोगस मजूर दाखविण्यात आले. हे मजूर कधीच कामावर आले नाहीत. अभियंता वाढई व गौरकार यांनी मोजमाप करण्यासाठी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी गेले असता जे मजूर दिसून आले. तेवढीच योग्य असून कागदोपत्री नोंदविलेले मजूर बोगस असल्याची माहिती पुढे आली आहे. शिवाय, जे मजूर काम करीत आहेत त्यांच्या नावावरही जास्तीचे मोजमाप दाखविण्यात आले. कामावर उपस्थित नसतानाही बोगस मजुरांची नावे नोंदवून निधीचा गैरव्यवहार करण्यात आला, असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.बोर्डा झुल्लूरवार येथील ग्रामपंचायतीमध्ये भाजप समर्थकांचे वर्चस्व आहे. याचाच गैरफायदा उचलल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाºयांकडून चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांंनी केली आहे. बोडी खोलीकरणाबाबत ग्रामसेविका उराडे यांच्या भ्रमणध्वनीद्वारे विचारणा केली. मात्र, संपर्क होवू शकला नाही.बोडी खोलीकरणाच्या कामात बोगस मजूरांची नावे नोंदविण्यात आली. शिवाय, त्यांच्या नावावर निधी उचलण्यात आल्याची तक्रार मिळाली आहे. त्यामुळे यासंदर्भातील पत्र अभियंत्यांना देण्यात आले. त्यांच्याकडून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावरच पूढील कार्यवाही करू.- शशिकांत शिंदे, बीडीओ, पोंभुर्णाबोडी खोलीकरणाच्या कामाबाबत चौकशी पूर्ण झाली. अहवाल पूर्ण झाल्यावर संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे.- सतीश वाढई, तंत्रज्ञबोर्डा झुल्लूरवार येथील बोडी खोलीकरणाबाबत पत्र देवून ग्रामरोजगार सेवकांकडून माहिती मागितली असून आर्थिक घोळ झाल्याचा अंदाज आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करू.- गौतम रामटेके सरपंच, बोर्डा झुल्लूरवार